Lokmat Agro >शेतशिवार > नव्या ७ हजार गावांचा समावेश करत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनच्या दुसऱ्या टप्प्याला मंत्रिमंडळाची मंजुरी

नव्या ७ हजार गावांचा समावेश करत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनच्या दुसऱ्या टप्प्याला मंत्रिमंडळाची मंजुरी

Cabinet approves second phase of Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Yojana including new 7 thousand villages | नव्या ७ हजार गावांचा समावेश करत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनच्या दुसऱ्या टप्प्याला मंत्रिमंडळाची मंजुरी

नव्या ७ हजार गावांचा समावेश करत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनच्या दुसऱ्या टप्प्याला मंत्रिमंडळाची मंजुरी

nanaji deshmukh krishi sanjivani yojana नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

nanaji deshmukh krishi sanjivani yojana नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

शेअर :

Join us
Join usNext

मुंबई : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

राज्यातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास सहाय्य करणे या उद्देशाने राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

या प्रकल्पामध्ये सद्य:स्थितीत समाविष्ट असलेल्या छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशीव, लातूर, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव व नाशिक हे १६ जिल्हे आहेत.

विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली अशा एकूण २१ जिल्ह्यांमध्ये अंदाजित सहा हजार कोटी रुपयांच्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा टप्पा-२ राबविण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात ५,२८४ गावांचा समावेश होता. दुसऱ्या टप्प्यात सद्यस्थितीत समाविष्ट असलेल्या १६ जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली आदी २१ जिल्ह्यातील ६,९५९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी अंदाजित खर्च ६ हजार कोटींचा असून त्यासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य घेण्यात येणार आहे.

प्रकल्पाच्या टप्पा दोन मध्ये समाविष्ट करण्यासाठी गावांसाठीचे निकष निर्धारित करुन त्यानुसार गावांच्या निवडीबाबतची प्रक्रिया पूर्ण करुन निवड केलेल्या एकूण ६९५९ गावांच्या यादीस  मान्यता देण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा दोनसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची स्थापन करण्यात आली आहे.

Web Title: Cabinet approves second phase of Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Yojana including new 7 thousand villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.