Join us

कालव्याच्या पाण्याचा मिळाला आधार; चारा पिकांसोबत भाजीपाला निघणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 10:36 AM

शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन इसापूर धरण प्रशासनाने परिसरातील शेतकऱ्यांसाठी पाणीपाळी देणे सुरू केल्याने शेतकरी काहीअंशी सुखावला.

हिंगोली जिल्ह्यातील इसापूर धरणाचे पाणी यावर्षी वेळेवर मिळत आहे. त्यामुळे उन्हाळी ज्वारी कळमनुरी तालुक्यातील काही भागांत बहरली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे. दरम्यान, उन्हाळी ज्वारीबरोबर इतर भाजीपाला पिके घ्यायची असल्याने पाणीपाळीवर वेळेवर व अधिकची सोडावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

६ मार्चपासून इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. अजूनही हे पाणी तीन ते चार दिवस चालणार आहे. या पाण्यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होत असून, जनावरांनाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. तसेच या परिसरातील जलस्तरही वाढले गेले आहे. ज्यामुळे या परिसरातील भागात काही प्रमाणात पाण्याची टंचाईही दूर झाली आहे. सध्या इसापूर धरणात ५१ टक्के जलसाठा आहे. इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून तालुक्यातील जवळपास ५२ गावांना पाणी सोडले जात आहे.

यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे आजमितीस तालुक्यातील विहीर, तलाव आदींची पाणीपातळी खालावली आहे. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन इसापूर धरण प्रशासनाने कळमनुरी तालुक्यातील या गावातील शेतकऱ्यांसाठी पाणीपाळी देणे सुरू केले  आहे.

गटशेती फायद्याची; शेतकर्‍यांनी ३० एकरमध्ये मिळवलं ७३२ क्विंटल कापसाच उत्पादन 

यामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून उन्हाळी पिके शेतकऱ्यांनी घेणे सुरू केले आहे. यावर्षी खरीप व रब्बी हंगामामध्ये पावसाने म्हणावी तेवढी साथ दिली नाही. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना शेतकर्‍यांना करावा लागला. त्यानंतर पिके चांगली आली; परंतु कीड व अळीने पिके फस्त केली. त्यामुळे शेतकर्‍यांवर आर्थिक संकट कोसळले. 

शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन इसापूर धरण प्रशासनाने पाणीपाळी देणे सुरू केले आहे. पैनगंगा प्रकल्पातून (इसापूर धरणातून) तालुक्यातील वराडी, मोरगव्हाण, कडपदेव, सुकळी, मोरवड, टाकळी, साळवा, शेनोडी, मुढळ, डिग्गी, गारोळ्याची वाडी, वाकोडी, घोडा, कामठा, देवजना, तरोडा, शेवाळा, गौळबाजार, बेलमंडळ, येगाव, बाभळी, गंगापूर, येळगाव (तु.), चिखली, वारंगा, दाती, कृष्णापूर, आखाडा बाळापूर, पिंपरी, कान्हेगाव, कुरतडी, तोंडापूर, कुंभारवाडी, फुटाणा, दांडेगाव, डोंगरकडा, रेडगाव, वडगाव, भाटेगाव, जामगव्हाण, वरूड, सुकळी (वीर), जवळा पांचाळ, गुडलवाडी, हिवरा आदी गावांसह तालुक्यातील ५२ गावांना इसापूर धरणातून पाणी मिळत आहे.

टॅग्स :पीकसमर स्पेशलज्वारीशेतीशेतकरीपीक व्यवस्थापन