Lokmat Agro >शेतशिवार > गारपीट नंतर फळ व भाजीपाला पिकांची घ्यावयाची काळजी

गारपीट नंतर फळ व भाजीपाला पिकांची घ्यावयाची काळजी

Care to be taken of fruit and vegetable crops after unseasonal rain and hailstorm | गारपीट नंतर फळ व भाजीपाला पिकांची घ्यावयाची काळजी

गारपीट नंतर फळ व भाजीपाला पिकांची घ्यावयाची काळजी

गारपीट व अवकाळी पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले असून, त्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे जेणेकरून पिके त्या परिस्थितीतून लवकरात लवकर सावरतील.

गारपीट व अवकाळी पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले असून, त्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे जेणेकरून पिके त्या परिस्थितीतून लवकरात लवकर सावरतील.

शेअर :

Join us
Join usNext

गारपीट व अवकाळी पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले असून, त्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे जेणेकरून पिके त्या परिस्थितीतून लवकरात लवकर सावरतील.

डाळिंब
- काढणी अवस्थेतील बागांसाठी हस्त बहार धरलेल्या डाळिंब बागांची फळे काढणी अवस्थेत असताना गारांचा, तसेच पावसाचा फटका जास्त प्रमाणात बसलेला आहे. या बागेतील फळांना इजा झाली असून, काही ठिकाणी फळे तडकण्याचे प्रमाण दिसून येत आहे. जमिनीमध्ये ओलावा असल्याने बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढू शकते.
- अवकाळी पावसानंतर त्वरित ६ ते ७ दिवसांच्या अंतराने बोर्डो मिश्रण अर्धा टक्के किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड २.५ ग्रॅम प्रति लिटर किंवा कॉपर हायड्रॉक्साइड २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी.
तसेच झाडांच्या मोडलेल्या फांद्या छाटून झाडांना योग्य आकार देऊन घ्यावा. झाडे पडली असल्यास किंवा वाकलेली असल्यास त्यांना बांबूंचा आधार देऊन खतांचे आणि पाण्याचे व्यवस्थापन करावे.

आंबा
- आंबा पिकामध्ये गारपीट, तसेच वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळांची गळ झाली आहे व सोबत कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
बागेतील फळगळ थांबविण्यासाठी १३:००:४५ हे खत १० ग्रॅम प्रति लिटर फवारावे. 
भुरी व फुलकिडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हेक्झाकोनॅझोल १ मि. लि. अधिक फिप्रोनील १.५ मि. लि. प्रति लिटर एकत्रितपणे फवारावे.

कांदा
- कांदा पातीला गारपिटीमुळे जखमा झाल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे.
यासाठी अॅझाक्सीस्ट्रोबीन ०.५ मि. लि. प्रति लिटर किंवा टेब्युकोनॅझोल १ मि. लि. प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.
तसेच फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील १.५ मि. लि. प्रति लिटर स्टीकरसह फवारावे.
यानंतर दुसरी फवारणी १३:००:४५ ची पाच ग्रॅम प्रति लिटर अधिक सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मिश्रणांची २.५ ग्रॅम प्रति लिटर एकत्रितपणे फवारणी करावी.
अशा अवस्थेत पिकास जमिनीतून एकरी ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.

टोमॅटो
- गारपिटीमुळे खोड व फांद्यांना इजा झाली असल्यास कॉपर हायड्रॉक्साइड २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी.
- करपा रोगाच्या नियंत्रणासाठी बेनोमिल ०.५ ग्रॅम प्रति लिटर, फळ पोखरणाऱ्या अळी आणि फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी स्पिनोसॅड ०.३ मि. लि. प्रति लिटर या प्रमाणात फवारावे.
तसेच फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील १.५ मि.लि. प्रति लिटर अधिक करंज तेल २ मि.लि. प्रति लिटर स्टीकरसह फवारावे.

वेलवर्गीय भाजीपाला
वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भुरी आणि अॅन्थ्रक्नोज नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझॉल एक मि. लि. प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करून घ्यावी.

श्री. विशाल जी. चौधरी
विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण) कृषी विज्ञान केंद्र मालेगाव
८०८७९४२०८४

Web Title: Care to be taken of fruit and vegetable crops after unseasonal rain and hailstorm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.