Join us

CCI Cotton Purchase : अखेर सीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात मात्र ८ टक्क्यांपेक्षा कमी आर्द्रतेच्या मालाला मिळणार हमीभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2024 10:03 AM

यंदा कापसाला खासगी बाजारात चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक दिवसांपासून सीसीआयकडून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. अखेर जिल्ह्यात सीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात झाली असून, शुक्रवारी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सीसीआयचे केंद्र जळगाव शहरात सुरू करण्यात आले आहे.

जळगाव : यंदा कापसाला खासगी बाजारात चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक दिवसांपासून सीसीआयकडून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. अखेर जिल्ह्यात सीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात झाली असून, शुक्रवारी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सीसीआयचे केंद्र जळगाव शहरात सुरू करण्यात आले आहे.

शिवाजीनगर भागातील शांती एक्झिम येथे हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सीसीआयचे केंद्र प्रमुख के.पी. मीना, अंशू प्रिया, बाजार समितीचे सचिव प्रमोद काळे, बाजार अधीक्षक विकास सूर्यवंशी, पूनमचंद राठोड, जितेंद्र खलसे आदी उपस्थित होते. दरम्यान, जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही सीसीआयकडून खरेदी केंद्र सुरू करण्याचीही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

तरच मिळणार हमीभाव...

■ सीसीआयच्या केंद्रावर माल विक्रीसाठी आणताना हमीभावासाठी काही निकष निश्चित करुन देण्यात आले आहेत. आर्द्रतेचे प्रमाण जर ८ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर त्या शेतकऱ्यांना ७ हजार ५२१ रुपयांचा हमीभाव देण्यात येणार आहे, तर १२ टक्क्यांपर्यंतची आर्द्रता राहिल्यास त्या शेतकऱ्यांना ७ हजार १२१ रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. १२ टक्क्यांपेक्षा जास्तीची आर्द्रता राहिल्यास त्यात अजून दर कमी होण्याची शक्यता आहे.

ही कागदपत्रे आवश्यक

सीसीआयकडे माल विक्री करताना शेतकऱ्यांना कापूस पेरा असलेला सात बाराचा उतारा, आधार कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक ही कागदपत्रे आवश्यक राहणार आहेत.

हेही वाचा : Success Story : डाळबट्टी पिठातून उभारला शेती प्रक्रिया उद्योग; पळसगावचा प्रदीप करतोय वार्षिक ५० लाखांची उलाढाल

टॅग्स :कापूसशेतकरीशेतीशेती क्षेत्रमार्केट यार्डजळगाव