Join us

'CCRI' : 'सीसीआरआय'चे क्रांतिकारी पाऊल शेतकऱ्यांना फायदेशीर कसे ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 15:07 IST

'CCRI' : लिंबूवर्गीय फळांना नवी दिशा देण्यासाठी केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने संत्रा, मोसंबीच्या १७ परदेशी प्रजाती आयात केल्या आहेत. त्याचा शेतकऱ्यांना कसा उपयोग होईल ते वाचा सविस्तर

नागपूर : केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था (आयसीएआर सीसीआरआय) ने संत्रा, मोसंबी या लिंबूवर्गीय फळांच्या उच्च दर्जाच्या १७ प्रजाती आयात केल्या आहेत. या जाती त्यांच्या उच्च दर्जाच्या फळगुणवत्तेसाठी, उत्पादन क्षमतेसाठी आणि हवामान सहनशीलतेसाठी प्रसिद्ध आहेत आणि भारतातील लिंबूवर्गीय फळांच्या उत्पादनात नवी दिशा मिळेल, असा दावा 'सीसीआरआय'ने (CCRI) केला आहे.

'सीसीआरआय'ने अमेरिकेच्या नॅशनल क्लोनल जर्मप्लाजम रिपॉजीटरी फॉर सिट्रस, रिव्हरसाइड, कॅलिफोर्निया येथून या १७ उच्च दर्जाच्या लिंबूवर्गीय फळांच्या जाती यशस्वीरीत्या आयात केल्या आहेत.

आयात केलेल्या जातींमध्ये सहा मोसंबी (बाहियानिहा, फ्रॉस्ट, लीमा, मिडनाईट, ऑलिम्पिक गोल्ड आणि सलुस्तियाना), तीन संत्र्याच्या जाती (पिक्सी, शास्ता गोल्ड आणि ताहो गोल्ड), ऑस्ट्रेलियन फिंगर लाइम (मायक्रोसिट्रस ऑस्ट्रेलिसिका), पुमेलो हायब्रीड (कॉकटेल), टैगोर (किंग), टॅन्नेलो (मिनिओला) आणि चार खुंट प्रजाती (फ्लाइंग ड्रॅगन, यूएस ८१२, सी-३५ आणि ट्रॉयर) यांचा समावेश आहे.

या जाती भारतातील लिंबूवर्गीय फळांच्या उत्पादनात क्रांती घडवू शकतात, असा दावा सीसीआरआयचे संचालक डॉ. दिलीप घोष यांनी केला आहे.

डॉ. घोष आणि नॅशनल क्लोनल जर्मप्लाझम रिपॉजीटरी फॉर सिट्रस, रिव्हरसाइड, कैलिफोर्निया येथील संचालक डॉ. रॉबर्ट क्रूगर आणि वनस्पती रोगतज्ज्ञ डॉ. के. एल. मंजुनाथ यांच्या समन्वयातून हा उपक्रम साध्य झाला.

या सहकार्याअंतर्गत भारताला या उच्च दर्जाच्या लिंबूवर्गीय फळांच्या जाती विनामूल्य प्रदान करण्यात आल्या. या जातींचे भारतातील विविध हवामान परिस्थितीत कार्यक्षमतेने मूल्यांकन केले जाईल, असे डॉ. घोष यांनी सांगितले.

'भारत सरकारच्या' 'विकसित भारत २०४७' योजनेशी सुसंगत आहे, ज्यामध्ये लिंबूवर्गीय फळ निर्यातीला चालना देणे, आयातीवर नियंत्रण आणणे आणि आत्मनिर्भरता व शाश्वता साध्य करणे हा आहे.

'सीसीआरआय'ने ३३ सिट्रस जाती (खुंट प्रजातीसह) आयात करण्याची परवानगी यापूर्वीच घेतली होती. पहिल्या टप्प्यात १७ जाती प्राप्त झाल्या असून उर्वरित जाती मार्च २०२५ पर्यंत भारतात पोहोचतील.

या जातींवर भारतातील विविध हवामान भागांमध्ये चाचण्या घेतल्या जातील, ज्या त्यांच्या अनुकूलता, उत्पादनक्षमता, फळांची गुणवत्ता आणि ग्राहकांची पसंती यासाठी उपयुक्त ठरतील. डॉ. दिलीप घोष आणि आयसीएआर- एमएमआरआयचे फळ विज्ञान शास्त्रज्ञ डॉ. दर्शन एम. कदम यांच्या नेतृत्वाखाली या जातींवर संशोधन केले जाईल.

'या' जाती केल्या आयात

* 'सीसीआरआय'ने अमेरिकेच्या नॅशनल क्लोनल जर्मप्लाजम रिपॉजीटरी फॉर सिट्रस, रिव्हरसाइड, कॅलिफोर्निया येथून या १७ उच्च दर्जाच्या लिंबूवर्गीय फळांच्या जाती यशस्वीरीत्या आयात केल्या आहेत.

* आयात केलेल्या जातींमध्ये सहा मोसंबी (बाहियानिहा, फ्रॉस्ट, लीमा, मिडनाईट, ऑलिम्पिक गोल्ड आणि सलुस्तियाना), तीन संत्र्याच्या जाती (पिक्सी, शास्ता गोल्ड आणि ताहो गोल्ड), ऑस्ट्रेलियन फिंगर लाइम (मायक्रोसिट्रस ऑस्ट्रेलिसिका), पुमेलो हायब्रीड (कॉकटेल), टैगोर (किंग), टॅन्नेलो (मिनिओला) आणि चार खुंट प्रजाती (फ्लाइंग ड्रॅगन, यूएस ८१२, सी-३५ आणि ट्रॉयर) यांचा समावेश आहे.

* या जाती भारतातील लिंबूवर्गीय फळांच्या उत्पादनात क्रांती घडवू शकतात, असा दावा सीसीआरआयचे संचालक डॉ. दिलीप घोष यांनी केला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Orange Export : युरोपियन बाजारपेठेत संत्रा निर्यातीसाठी कसे हवे फळ? काय कराल उपाययोजना

टॅग्स :शेती क्षेत्रफळेकृषी विज्ञान केंद्रशेतीशेतकरी