शाहरूख खानची लेक सुहाना खानने अलीकडेच अलिबागच्या वल गावात जमीन खरेदी केली आहे. अशी बातमी आली होती. मात्र, ती शेती करत नाही; पण तुम्हाला माहितीये का. बॉलिवूडचे असेही काही सेलिब्रिटी आहेत जे प्रसिद्धीसाठी नव्हे, तर आवड आणि मातीविषयी असलेल्या प्रेमामुळे शेती करतात. चला तर मग बघुयात ते सेलेब्रिटी कोण आहेत?
धर्मेंद्र
पंजाबचा पुत्तर अर्थात पंजाबचा मुलगा धर्मेंद्र यांना त्यांच्या शेताबद्दल विशेष प्रेम आहे. लोणावळ्यात त्यांचा एक भव्य फार्म हाउस आहे. जिथे त्यांच्या स्टाफच्या साह्याने धर्मेंद्र बरेच फळे आणि भाज्या उगवतात. फार्म हाऊसवर गाय, बैल, म्हशी, बकऱ्यादेखील आहेत.
स्ट्रॉबेरी, चेरी, टोमॅटोची शेती
बॉलिवूडच्या अभिनेत्रीही मागे नाहीत. प्रिती झिंटा, शिल्पा शेट्टी, जुही चावला यासारख्या काही अभिनेत्री आहेत त्यानी शेतजमीनीवर भाज्या, फळे पिकवतात. अभिनयासोबतच यातही आनंद मिळतो. त्या सोशल मीडियावर त्यांच्या शेतातील फोटो शेअर करत असतात. त्या चाहत्यांच्या संपर्कात असतात.
नवाजुद्दीन सिद्दीकी
चित्रपटात येण्यापूर्वी नवाजुद्दीन हे एक शेतकरी होते. मुजफ्फरनगर येथील बुढाना हे त्यांचे गाव आहे, जिथे त्यांचे शेत आहे. चित्रपटसृष्टीत नाव कमाविल्यानंतर नवाजुद्दीनला शेताबद्दल विशेष प्रेम वाढले. आताही ते त्यांच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून शेतात काम करतात.
जॅकी श्रॉफ
मुंबई आणि पुण्याच्या मध्य मावळ येथे जॅकी श्रॉफ यांचा फार्म हाऊस आहे. ४४,००० वर्ग फूट एवढ्या परिसरात पसरलेल्या फार्म हाऊसमध्ये ते शेती करतात. येथे त्यांनी पेरूपासून ते सर्व फळे आणि भाज्यांची लागवड केली आहे. स्विमिंगपूलपासून ते बॅडमिंटन, टेनिस कोर्ट यांसारखी लग्झरियस सुविधा आहेत.
पंकज त्रिपाठी
नवाजुद्दीनप्रमाणे पंकज त्रिपाठीदेखील अभिनेता बनण्याअगोदर शेतकरी होते. ते त्यांच्या वडिलांसोबत शेती करत असत. चित्रपटसृष्टीत नाव कमाविण्यापूर्वी सुट्टीत ते गावी जाऊन शेती करून त्यांची इच्छा पूर्ण करायचे.
सलमान खान
सलमान त्याच्या पनवेल फार्म हाउसवर शेती करताना दिसतो. सोशल मीडियावर त्याने अनेकदा रोपे लावतानाचे फोटो पोस्ट केलेत. लॉकडाऊनच्या काळात, तर सलमान अधिकाधिक शेतात काम करायचा.
अधिक वाचा: तुमच्या विहिरीला पाणी कमी येतंय पावसा अगोदर करा हे नियोजन