Lokmat Agro >शेतशिवार > रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या खतांवरील अनुदानाला केंद्र सरकारकडून मंजुरी

रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या खतांवरील अनुदानाला केंद्र सरकारकडून मंजुरी

Central government announced subsidy on fertilizers for Rabi season 2023 | रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या खतांवरील अनुदानाला केंद्र सरकारकडून मंजुरी

रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या खतांवरील अनुदानाला केंद्र सरकारकडून मंजुरी

रब्बी हंगामासाठी अवघे ५७ टक्के साठा राज्याकडे उपलब्ध असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे.

रब्बी हंगामासाठी अवघे ५७ टक्के साठा राज्याकडे उपलब्ध असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

येणाऱ्या रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या खतांवरील अनुदान दर निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली असून शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने रब्बी हंगाम 2023-24 साठी (01.10.2023 ते 31.03.2024) फॉस्फेटिक आणि पोटॅशिक (P&K) खतांवर पोषण आधारित अनुदान (NBS) दर निश्चित करण्यासाठी खत विभागाने दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

दरम्यान, या अनुदानासाठी साधारण 22 हजार 303 कोटी रूपये एवढा खर्च अपेक्षित असल्याची माहिती आहे. तर शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किंमतीत या खतांची सुरळीत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी फॉस्फेटिक आणि पोटॅशिक या खतांवर अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती आहे. यावर्षीचा रब्बी हंगाम 01.10.2023 ते 31.03.2024 यादरम्यान असून या काळातच हे अनुदान देण्यात येणार आहे.

किती मिळणार अनुदान?

खतांचा प्रकार - प्रतिकिलो मिळणारे अनुदान

नायट्रोजन (युरिया) - 47.02 रूपये प्रतिकिलो
फॉस्फरस - 20.82 रूपये प्रतिकिलो
पोटॅश - 2.38 रूपये प्रतिकिलो
सल्फर -  1.89 रूपये प्रतिकिलो

केंद्र सरकारने खतांवर जाहीर केलेल्या २२ हजार ३०३ कोटींच्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून डीएपी खत १३५० रूपये प्रतिबॅग या दराने मिळणार आहे. त्याचबरोबर एनपीके १४७० रूपये बॅग याप्रमाणे खते मिळणार आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. 

युरिया, डीएपी, एमओपी आणि सल्फर या खतांच्या आणि इतर कृषी मालाच्या आंतरराष्ट्रीय किमतींमधील अलीकडील कल लक्षात घेता, सरकारने हा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत खते उपलब्ध होण्यासाठी खत कंपन्यांना मंजूर आणि अधिसूचित केलेल्या दरांनुसार अनुदान दिले जाईल.

Web Title: Central government announced subsidy on fertilizers for Rabi season 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.