Join us

टोमॅटो ५० रुपये किलोने विकण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

By मुक्ता सरदेशमुख | Published: August 15, 2023 8:00 PM

देशभरात महागाईचा भडका उडाल्याने केंद्र सरकारने टोमॅटो पन्नास रुपये किलोने विकण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ ...

देशभरात महागाईचा भडका उडाल्याने केंद्र सरकारने टोमॅटो पन्नास रुपये किलोने विकण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक विभागाला टोमॅटो पन्नास रुपये किलोने विकण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.

जुलै महिन्यात खाद्यपदार्थांची महागाई ११.५१  टक्क्यांवर पोहोचली असून ऑक्टोबर २०२० नंतर महागाईची ही सर्वोच्च पातळी आहे. 

भाज्यांच्या वाढलेल्या किमतीमुळे विशेषतः टोमॅटोच्या किमतीमुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर सरकारने ही घोषणा केली. टोमॅटोच्या वाढत्या मागणीमुळे व वाढलेला किमतीमुळे अनेक शेतकरी कोट्याधीश झाल्याच्या घटना मागील महिन्याभरात झाल्यानंतर आता नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत विक्री होणारा टोमॅटो पन्नास रुपये दराने विकला जाणार आहे.

मंत्रालयाने सांगितले की, १४  जुलै २०२३  पासून दिल्ली एनसीआरमध्ये स्वस्त दरात टोमॅटोच्या विक्रीला सुरुवात झाली. १३ ऑगस्ट पर्यंत एनसीसीएफ आणि नाफेडने किरकोळ बाजारात १५ लाख टोमॅटोची खरेदी आणि विक्री केली. 

ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एनसीसीएफ आणि नाफेडने आंध्र प्रदेश महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये टोमॅटोची खरेदी विक्री केली आहे. प्रथम एनसीसीएफ आणि नाफेडने ९०  रुपये प्रति किलो दराने टोमॅटो विकण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर १६ जुलैपासून हा दर ८० रुपये प्रति किलो करण्यात आला. २०  जुलैपासून हा दर सत्तर रुपये प्रति किलो झाला. आणि आता स्वातंत्र्य दिनापासून टोमॅटोचा दर ५० रुपये किलो झाला आहे.

टॅग्स :शेतकरीकेंद्र सरकारभाज्यामहागाईशेतीपीक