मौजे कोकरूड तालुका शिराळा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकरूड येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी मिरज माननीय जी. एस. पाटील, प्रगतिशील शेतकरी विकास नांगरे पाटील, प्र. तालुका कृषी अधिकारी अरविंद शिंदे, कृषी पर्यवेक्षक अजित भोसले, कृषी सहाय्यक सातलिंग मेटकरी, श्री. रोकडे सर तसेच केंद्रप्रमुख माननीय मुलानी सर हजर होते.
त्यावेळी माननीय पाटील साहेब यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राळा, राजगिरा, नाचणी, बाजरी, ज्वारी, वरई इत्यादी तृणधान्य अत्यंत चांगली व आहारातील महत्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदरचे महत्व जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्याचा प्रचार प्रसिद्धी करून जनजागृती करावी असे आवाहन करण्यात आले. सदर आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर कसा करावा याची माहिती व सदर ठिकाणी स्टॉल लावून त्या ठिकाणी राळा, राजगिरा, नाचणी पासून केलेले उपपदार्थ मुलांना दाखवण्यात व त्याचे महत्त्व सांगण्यात आले.