Join us

शेतजमिनीचे आरोग्य तपासा अन् उत्पादन खर्चात करा मोठी बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 11:25 AM

'सॉइल हेल्थ मिशन' अंतर्गत मातीच्या विविध तपासण्या कण्यासाठी जिल्हा मृद चाचणी अधिकारी यांचे आवाहन.

जास्तीत जास्त उत्पादन मिळावे यासाठी दरवर्षी शेतकरी शेतात भरमसाट रासायनिक खतांचा मारा करीत असतात. मात्र, यामुळे बऱ्याचदा गरज नसताना जमिनीमध्ये रासायनिक खतांची मात्रा अधिक होते.

परिणामी, उत्पादन खर्चाच्या तुलनेत पिकावरील खर्च अधिक होतो. ही बाब टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधी माती परीक्षण करावे, जमिनीची आरोग्य पत्रिका पाहूनच खताचे नियोजन करण्याचा सल्ला जिल्हा मृद चाचणी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात शहानूरवाडी येथे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात जिल्हा मृद चाचणी अधिकारी कार्यालयात कार्यरत आहे. तसेच या ठिकाणी अत्याधुनिक माती परीक्षण प्रयोगशाळा आहे. मातीचे परीक्षण करण्यासाठी तंत्रज्ञ आणि अन्य अधिकारी कार्यरत आहेत.

शेत जमिनीचा पोत पाहूनच शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर करावा, यासाठी केंद्र सरकारने 'सॉइल हेल्थ मिशन' ही योजना आणली आहे. ज्याअंतर्गत मातीच्या विविध तपासण्या केल्या जातात. 

या योजनेंतर्गत जिल्यातील ९ तालुक्यांतील गावे निवडण्यात आली आहे. गतवर्षी जिल्ह्यातील ६ हजार ४८० माती नमुन्यांचे परीक्षण करण्याचे लक्ष्य जिल्हा मृद चाचणी अधिकाऱ्यांना देण्यात आले होते व हे उद्दिष्ट पूर्ण देखील केले गेले होते. कृषी विकास योजनेंतर्गतही २३१० माती नमुन्यांचे परीक्षण करण्यात आल्याची माहिती जिल्हा मृद चाचणी अधिकारी भीमरात वैद्य यांनी दिली

दरवर्षी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करावे, मार्च ते मे अखेरपर्यंत मातीनमुने प्रयोगशाळेकडे देऊ शकतात. माती परीक्षणामुळे जमिनीतील नत्र, स्फुरद आणि पालाश, सल्फर, जस्त तसेच लोह, झिंक इ. घटकांची माहिती मिळते. यासोबतच शेत जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाणही कळते. जमिनीत सेंद्रिय कर्बच नसेल तर रासायनिक खतांचा कितीही वापर केला नाही. अनावश्यक रासायनिक खतांचा वापर तरी त्याचा पिकाला लाभ होत टाळता येतो. परिणामी, उत्पादन खर्च कमी होतो. - भीमराव वैद्य, जिल्हा मृद चाचणी अधिकारी 

हेही वाचा - एकरात लाखोंची कमाई देणारी तूर भारी; ऊस, कपाशीला आता नको म्हणतोय शेतकरी

टॅग्स :शेतीशेतकरीखतेपीक व्यवस्थापन