Join us

तुमच्या जिल्ह्यात किती पाऊस पडला व किती पेरण्या झाल्या पहा आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 4:34 PM

महाराष्ट्रात यंदा विदर्भ मराठवाडा विभागात चांगला पाऊस झाला आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील बरेच जिल्हे कोरडे आहेत. यात पावसाचा खंड कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती आहे त्याची आकडेवारी पाहूया.

महाराष्ट्रात यंदा विदर्भ मराठवाडा विभागात चांगला पाऊस झाला आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील बरेच जिल्हे कोरडे आहेत. यात पावसाचा खंड कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती आहे त्याची आकडेवारी पाहूया. तुमच्या जिल्ह्यात किती पाऊस पडला किती पेरण्या झाल्या. तुम्हाला पिक विमा मिळेल का यासाठी महत्वाचा पाऊसाचा खंड किती पडला आहे त्याबद्दल माहिती पाहूया. संबंधित आकडेवारी कृषि विभाग महाराष्ट्र राज्य यांनी दिली आहे.

पर्जन्यमानभारतीय हवामान विभागानुसार राज्यात मान्सूनचे आगमन साधारणतः ७ जूनच्या दरम्यान होते. यावर्षी ११ जून रोजी कोकण विभागामध्ये मान्सूनचे आगमन झालेले आहे.

पर्जन्यमान

जून 2023

जुलै 2023

    (25 ऑगस्ट अखेर)

01 जून ते दि.25 ऑगस्ट अखेर

सरासरी

207.6  मिमी

330.9 मिमी

230.6 मिमी

769.1 मिमी

प्रत्यक्ष

111.3 मिमी  (5४ टक्के)

459.0  मिमी (139%)

92.3 मिमी (40%)

662.5 मिमी  (86%)

  • दि.25 ऑगस्ट रोजी 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडलेल्या जिल्हानिहाय महसूल मंडळांची संख्या : 4
  • गडचिरोली जिल्हा -4 मंडळ - अल्लापल्ली (66.75%), एटापल्ली (65.25%), तरडगांव (67.50%), भामरगड (78%)
  • 01 जून ते दि.25 ऑगस्ट पर्यंत पावसाचे दिवस (2.5 मीमी पेक्षा अधीक पाऊस ) - 54 
  • अहवालाचे दि.25 ऑगस्ट या एका दिवशी अधीकतम पाऊस पडलेले 5 जिल्हे - निरंक

01 जून ते दि.25 ऑगस्ट पर्यंत सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत पाऊस पडण्याची तालुकानिहाय वर्गवारी

तालुक्यांचे पर्जन्यमान (सरासरीशी तुलना %)

25 टक्के पेक्षा कमी

25 ते 50 टक्के

50 ते 75 टक्के

75 ते 100 टक्के

100 टक्के पेक्षा अधीक 

तालुक्यांची संख्या

0

22

117

129

87

01 जून ते दि.25 ऑगस्ट पर्यंत सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत 25 ते 50% पाऊस पडलेले तालुके

अ.क्र.

जिल्हा

तालुक्यांची संख्या

तालुक्यांची नावे

1

नाशिक

5

सिन्नर, चांदवड, नांदगाव, नाशिक, इगतपुरी

2

नंदूरबार

1

नंदूरबार

3

अहमदनगर

4

संगमनेर, कोपरगांव, श्रीरामपूर, राहुरी

4

पुणे

3

बारामती, पुरंदर (सासवड), हवेली (पुणे)

5

सातारा

कोरेगाव, फलटण

6

सांगली

2

कडेगाव, खानापूर (विटा)

7

कोल्हापूर

1

राधानगरी

8

बीड

1

वडवणी

9

बुलढाणा

1

बुलढाणा

10

अकोला

1

अकोट

11

अमरावती

1

दर्यापूर

 

एकूण

22

 

कृषी विभागनिहाय पावसातील खंडाचा तपशील (संख्या)

विभाग

कोंकण

नाशिक

पुणे

कोल्हापूर

औरंगाबाद

लातूर

अमरावती

नागपूर

राज्य एकूण

पर्जन्यमान (सरासरीशी %)

102

64

69

61

69

80

85

96

86

15 ते 21 दिवस खंड पडलेली महसूल मंडळ संख्या

0

36

77

89

82

130

77

7

498

21 दिवसापेक्षा जास्त खंड पडलेली महसूल मंडळ संख्या

0

35

136

46

26

45

12

0

300

पिक पेरणी

  • 5 वर्षाचे सरासरी क्षेत्र (2016-17 ते 2020-21)  = 142.00 लाख हे.
  • गतवर्षी (खरीप २०२२ मध्ये  आजचे दिनांकास)  =  141.37 लाख हे.
  • चालू वर्षी  (खरीप २०२३ मध्ये  आजचे दिनांकास) = 139.21 लाख हे.
  • (5 वर्षाच्या सरासरीशी - 98%) (गतवर्षाशी - 98%)

पावसाचा खंड असलेल्या महसूल मंडळांची संख्या (कालावधी २५.०७.२०२३ ते २५.०८.२०२३)

 

टॅग्स :पाऊसपेरणीखरीपपीकराज्य सरकारसरकार