Lokmat Agro >शेतशिवार > खरीप पिकातील प्रमुख तणांचे रासायनिक पद्धतीने नियंत्रण

खरीप पिकातील प्रमुख तणांचे रासायनिक पद्धतीने नियंत्रण

Chemical control of major weeds in kharif crops | खरीप पिकातील प्रमुख तणांचे रासायनिक पद्धतीने नियंत्रण

खरीप पिकातील प्रमुख तणांचे रासायनिक पद्धतीने नियंत्रण

पावसाने उघडीप दिली आहे, आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे त्यात तण नियंत्रणासाठी योग्य प्रमाणात तणनाशकांचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते.

पावसाने उघडीप दिली आहे, आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे त्यात तण नियंत्रणासाठी योग्य प्रमाणात तणनाशकांचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते.

शेअर :

Join us
Join usNext

खरीप हंगामातील ज्वारी बाजरी मका, तूर, मूग, उडीद आणि सोयाबीन पिकात काही विशिष्ट तणांचा प्रादुर्भाव होतो ज्यामुळे पिकाच्या उत्पादनात घट येते. या तणांचे पीक व तणे उगवण्यापूर्वी रासायनिक पद्धतीने खालीलप्रमाणे नियंत्रण करावे.

ज्वारी, मका, आणि बाजरी
या पिकातील गवतवर्गीय रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी अट्रॅझीन ५०% डब्लुपी किंवा अलाक्लोर  ५०% इसी ८० ग्रॅम/मिली, १० लिटर पाण्यातून फवारावे. ज्वारी पिकातील लव्हाळा, कुंजरू, दुधनी व रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी २,४-डी इथाईल  ईस्टर ३८% इसी, ६०मिली, १० लिटर पाण्यातून पेरणीनंतर २५-३० दिवसांनी फवारावे.
मका पिकातील लव्हाळा  गवताच्या नियंत्रणासाठी २,४-डी डायमेथील अमाईन क्षार ५८% इसी, १७ मिली, दहा लिटर पाण्यातून पेरणीनंतर ३०-३५ दिवसांनी फवारावे तर हंगामी गवतवर्गीय व काही रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी डायरॉन ८०%  डब्ल्यूपी किंवा टोपरॅमेझोन ३३.६ % एससी,२० ग्रॅम मिली पाण्यातून पेरणीनंतर १८-२५ दिवसांनी फवारावे.

तूर, मूग व उडीद
या पिकातील गवतवर्गीय व रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी अलाक्लोर ५०% इसी किंवा पेंडीमेथॅनील ३०% इसी ८० मिली १० लिटर पाण्यातून पीक पेरणीनंतर, पीक व तणे उगवण्यापूर्वी फवारावे. गवतवर्गीय तणांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर  २० ते २५ दिवसांनी क्यूझ्यालोफॉप इथाईल ५% इसी १५ ते २० मिली १० लिटर पाण्यातून फवारावे.

सोयाबीन
सोयाबीन पिकातील लव्हाळा व काही गवतवर्गीय रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी मेटोल्याक्लोर ५० % इसी किंवा फल्युझीकॉपपी ब्युटील १३.४ % इसी ४० मिली १० ली. पाण्यातून अनुक्रमे पीक व तणे उगवण्यापूर्वी आणि पेरणीनंतर १८ ते २० दिवसांनी फवारावे. पाखड व चिमणचारा तणाच्या  नियंत्रणासाठी क्यूझ्यालोफॉप इथाईल ५% इसी १५ ते २० मिली १० ली पाण्यातून पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी फवारावे. कुंजरु, केना, माठ, घोळ या तणांच्या नियंत्रणासाठी पेंडीमेथॅनील ३०%+ इमॅझाथॅपर २% इसी (वेलोर-३२) ५० ते ६० मिली १० लि. पाण्यातून पीक पेरल्यानंतर पीक व तण उगवण्यापूर्वी फवारावे. केना व पांढरी फुले यांच्या नियंत्रणासाठी अनिलोफॅास ३० % इसी ८० ते १०० मिली १० लिटर पाण्यातून पीक व तणे उगवण्यापूर्वी फवारावे.

डॉ. कल्याण देवळाणकर
७५८८०३६५३२
 

Web Title: Chemical control of major weeds in kharif crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.