Join us

Chief Minister Agriculture and Food Processing Scheme : शेतमालाला अन्न् प्रक्रिया उद्योगांची साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 11:21 AM

Chief Minister Agriculture and Food Processing Scheme : मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी किती निधी मंजूर झाला. कोणत्या उद्योगांना चालना देणार. 

Chief Minister Agriculture and Food Processing Scheme : 

शेतकऱ्यांचा शेतमाल कधी मोठया प्रमाणावर होतो. तेव्हा त्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतमाल फेकून देण्याची वेळ अनेकदा येते. परंतू असे न करता या शेतमालाला अन्न् प्रक्रिया उद्योगाची जोड दिली तर शेतकरी समृध्द होईल. ही़च गरज ओळखून मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना सन २०२४-२५ मध्ये राबविण्यात येणारी एक महत्वकांक्षी योजना आहे.राज्यातील अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देणे, शेतमालाचे मूल्यवर्धन करणे करिता शेतकऱ्यांचे सहभागाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहन देणे, उत्पादित अन्न पदार्थाच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, ऊर्जेची बचत व्हावी, यासाठीच्या प्रकल्पांच्या आधुनिकीकरणास प्रोत्साहन देणे याउद्दिष्टांसह शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना ही शंभर टक्के राज्य पुरस्कृत योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेसाठी २४ कोटी ७४ लाख ८२ हजार रुपये एवढा निधी कृषी आयुक्तांना वितरित करण्यास मान्यता गुरुवारी (८ ऑगस्ट रोजी) देण्यात आली. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने नुकताच जाहीर केला आहे. त्यानुषंगाने मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी सन २०२४-२५ च्या अर्थ संकल्पामध्ये ७५ कोटी रुपये एवढ्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगांतून चालना मिळणार आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रअन्नशेतकरीशेती