Lokmat Agro >शेतशिवार > शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Chief Minister appeals to farmers to turn to modern agriculture | शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'वर्षा' निवासस्थानी शेतकऱ्यांशी आज  संवाद साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'वर्षा' निवासस्थानी शेतकऱ्यांशी आज  संवाद साधला.

शेअर :

Join us
Join usNext

पारंपरिक पिकांसोबत नव्या तंत्रज्ञानाची जोड देत पीक पद्धतीत बदल होणे आवश्यक असल्याचे सांगत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 

शेतकऱ्यांना पीएम किसानचा १४ व हप्ता खाती जमा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'वर्षा' निवासस्थानी शेतकऱ्यांशी आज  संवाद साधला. यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, अपर मुख्य सचिव अनुपकुमार आणि ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करीत असून भात लागवडीसाठी आधुनिक यंत्रे अनेक ठिकाणी पुरविण्यात आली आहेत. या यंत्रांचा वापर करा, ठाणे, पालघरच्या काही भागात नाचणी, वरीची उत्पादकता चांगली असून त्याचे क्षेत्र वाढवा, नाचणीला मोठी मागणी असून यंदाचे वर्ष हे तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

 “राज्यात पावसाला चांगली सुरूवात झाली आहे. भात लावणीसाठी यंत्राची मदत घ्या, कमी वेळेत जास्त काम होईल, शिवाय मनुष्यबळही कमी लागेल…नागली, वरईसह आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड करा, यातून उत्पन्न वाढण्यास मदत होईल” असेही ते म्हणाले. 

 

Web Title: Chief Minister appeals to farmers to turn to modern agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.