Lokmat Agro >शेतशिवार > CIBIL Score : शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सिबील स्कोअर किती? 'या' कारणामुळे प्रकल्प अर्ध्यावर वाचा सविस्तर

CIBIL Score : शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सिबील स्कोअर किती? 'या' कारणामुळे प्रकल्प अर्ध्यावर वाचा सविस्तर

CIBIL Score: What is the CIBIL score of farmer producer companies? Projects are half-finished due to 'this' reason Read in detail | CIBIL Score : शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सिबील स्कोअर किती? 'या' कारणामुळे प्रकल्प अर्ध्यावर वाचा सविस्तर

CIBIL Score : शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सिबील स्कोअर किती? 'या' कारणामुळे प्रकल्प अर्ध्यावर वाचा सविस्तर

CIBIL Score: बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन योजनेंतर्गत (स्मार्ट) (Smart) राज्यातील २८३ शेतकरी उत्पादक कंपन्यांना उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. परंतु, काही कारणास्तव त्यांना बँककडून कर्ज नाकारल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. (CIBIL Score)

CIBIL Score: बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन योजनेंतर्गत (स्मार्ट) (Smart) राज्यातील २८३ शेतकरी उत्पादक कंपन्यांना उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. परंतु, काही कारणास्तव त्यांना बँककडून कर्ज नाकारल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. (CIBIL Score)

शेअर :

Join us
Join usNext

बापू सोळुंके

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन योजनेंतर्गत (स्मार्ट) (Smart) राज्यातील २८३ शेतकरी उत्पादक कंपन्यांना उद्योग उभा करण्यासाठी बँकांनी कर्ज नाकारल्याची खळबळजनक माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली. (CIBIL Score)
 
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांचा सिबील स्कोअर (CIBIL Score)चांगला नसल्याचे कारणासाठी बँकांकडून असल्याचे जात आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन योजनेंतर्गत (स्मार्ट) शेतकरी उत्पादक कंपन्यांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या ६० टक्के अनुदान देण्यात येते. (Smart)

या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या प्रकल्प खर्चाच्या १० टक्के स्वनिधी देणे बंधनकारक आहे. ३० टक्के बँकेकडून कर्ज आणि ६० टक्के अनुदान अशा प्रकारे निधी उभारून प्रकल्प पूर्ण करता येतो. (CIBIL Score)

बहुतेक कंपन्यांचे प्रकल्प २ ते ५ कोटी रुपयांचे आहेत. अशा वेळी कंपन्यांकडून त्यांच्या प्रकल्पासाठी ३० टक्के निधी उभा करण्यासाठी बँकेकडे कर्जासाठी  (CIBIL Score) अर्ज करतात.

एकाही संचालकाचा सिबिल स्कोअर चांगला नसेल तर कर्ज मिळत नाही. बँका कर्ज देण्यास तयार असतील अथवा ४० टक्के निधी उभारण्यास शेतकरी उत्पादक कंपनीची तयारी असेल तरच प्रस्ताव स्वीकारण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला.

११४७ कंपन्यांचे आतापर्यंत अर्ज

* कालपर्यंत राज्यातील १,१४७ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कृषी उद्योग उभारण्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज केले.

* या कंपन्यांनी त्यांच्या प्रस्तावित प्रकल्पांचे प्रस्ताव कृषी विभागाकडे दाखल केले आहेत.

* यापैकी १०९७ कंपन्यांचे डिटेल प्रोजक्ट रिपोर्ट (डीपीआर) कृषी विभागाने मंजूर केले असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली.

* मात्र केवळ संचालकांचा सिबील चांगला नाही आणि संचालकांच्या नावे शेतजमीन नाही, या कारणामुळे २८३ कंपन्यांना बँकांनी कर्ज नाकारले.

महिला संचालकांच्या नावे जमीन नसेल, तर बँकांकडून त्यांनाही कर्ज नाकारले जाते. त्यांच्या पतीच्या नावे संपत्ती असल्याचे पाहून कर्ज द्यावे, अशा सूचना बँकांना आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्याच्या १०९७ प्रकल्पांच्या डीपीआरला मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच त्यांना अनुदान दिले जाईल. - हेमंत वसेकर, प्रकल्प संचालक (स्मार्ट), कृषी आयुक्तालय

कर्जमाफीच्या आशेपोटी शेतकरी कर्जाची परतफेड करीत नाही. यामुळे ९९ टक्के शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर चांगला नसतो. शिवाय बँका कर्जासाठी तारण मागतात. शेतकरी तारण देऊ शकत नाही. ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम आहे. मात्र आमच्यासारख्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना संचालकांचा सिबील चांगला नाही, असे सांगून कर्ज नाकारले जाते. - आकाश गौर, संचालक, शेतकरी उत्पादक कंपनी

९९ % शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर परतफेडीअभावी वाईट
 
कर्जमाफी होण्याच्या आशेने शेतकरी मागील कर्जाची परतफेड करत नाहीत. यामुळे त्यांचा सिबिल स्कोअर (CIBIL Score) बिघडतो. शेतकरी उत्पादक कंपनी संचालकांबाबत हेच घडतेय.

हे ही वाचा सविस्तर : Mushrooms : आरोग्यवर्धक ऑयस्टर मशरूम खा अन् निरोगी राहा वाचा सविस्तर

Web Title: CIBIL Score: What is the CIBIL score of farmer producer companies? Projects are half-finished due to 'this' reason Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.