Lokmat Agro >शेतशिवार > अवकाळी, गारपीटीचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा, शेतकऱ्यांना मिळणार तीन हेक्टरपर्यंत मदत

अवकाळी, गारपीटीचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा, शेतकऱ्यांना मिळणार तीन हेक्टरपर्यंत मदत

Clear the way to get money for bad weather, hail, farmers will get help up to three hectares | अवकाळी, गारपीटीचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा, शेतकऱ्यांना मिळणार तीन हेक्टरपर्यंत मदत

अवकाळी, गारपीटीचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा, शेतकऱ्यांना मिळणार तीन हेक्टरपर्यंत मदत

सरकारकडून परिपत्रक जारी, शेतकऱ्यांना दिलासा

सरकारकडून परिपत्रक जारी, शेतकऱ्यांना दिलासा

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात अवकाळी, गारपिटीचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनुसार तीन हेक्टरच्या मर्यादित जिरायतीसाठी हेक्टरी १३,६०० रुपये, बागायतींसाठी हेक्टरी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी तब्बल ३६ हजार रुपये मदत करण्याचे निर्देश महसूल व वन विभागाने परिपत्रकाद्वारे जारी केले आहेत. या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचा आढावा घेऊन मदत देण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये राज्य सरकारने घेतला होता.

निकषाबाहेर जाऊन मदत देण्याचे निर्देश

मात्र, निर्णयाची अंमलबजावणी न केल्याने शेतकऱ्यांनी सरकार विरोधात रोष व्यक्त केला. अनेक भागांत शेतकरी रस्त्यावरही उतरले. राज्य सरकारने याची दखल घेत, बाधित शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर जाऊन तीन हेक्टरच्या मयदित मदत देण्याचे निर्देश आता दिले आहेत.

अशी मिळेल मदत

  • एसडीआरएफच्या निकषानुसार यापूर्वी २ हेक्टरच्या मर्यादित मदत दिली जात होती.
  • महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रमाण तीन हेक्टरच्या मयदिपर्यंत वाढविण्यात आले.
  • राज्यात त्यानंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारने देखील याच निर्णयाच्या धर्तीवर जिरायती शेतीसाठी ८,५०० रुपये ऐवजी १३,५०० रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी १७ हजार रुपयांऐवजी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी २२,५०० रुपयांऐवजी आता ३६ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

Web Title: Clear the way to get money for bad weather, hail, farmers will get help up to three hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.