Lokmat Agro >शेतशिवार > संत्रा उत्पादकांची वाढली चिंता, ५० हजार हेक्टरमध्ये आंबियाची गळ 

संत्रा उत्पादकांची वाढली चिंता, ५० हजार हेक्टरमध्ये आंबियाची गळ 

climate change affects orange fruits in Vidharbha | संत्रा उत्पादकांची वाढली चिंता, ५० हजार हेक्टरमध्ये आंबियाची गळ 

संत्रा उत्पादकांची वाढली चिंता, ५० हजार हेक्टरमध्ये आंबियाची गळ 

सध्या वातावरणातील बदल बुरशीजन्य रोग, पोषक तत्त्वाची कमी, शेतातील पाण्याचा निचरा न होणे यासह अन्य कारणांमुळे संत्राच्या आंबिया बहराची गळ होत आहे.

सध्या वातावरणातील बदल बुरशीजन्य रोग, पोषक तत्त्वाची कमी, शेतातील पाण्याचा निचरा न होणे यासह अन्य कारणांमुळे संत्राच्या आंबिया बहराची गळ होत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

दोन आठवड्यांपासून विदर्भात आंबिया संत्र्याची फळ गळ होत असल्याने उत्पादकांची चिंता वाढली आहे. यासंदर्भात जिल्ह्याधिकाऱ्यांनी पाहणी केली. पंचनाम्याबाबत अद्याप शासनादेश नसल्याने कृषी विभागाची क्षेत्रीय यंत्रणा गपगार असल्याचे दिसून आलेत.

सध्या वातावरणातील बदल बुरशीजन्य रोग, पोषक तत्त्वाची कमी, शेतातील पाण्याचा निचरा न होणे यासह अन्य कारणांमुळे संत्राच्या आंबिया बहराची गळ होत आहे. त्यामुळे पक्व होण्याच्या प्रक्रियेतील संत्र्याची गळ होऊन झाडाखाली फळांचा खच पडताना दिसतोय. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी खील याबाबत काही भागात पाहणी करून शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. पंचनामे करण्याची सूचना यंत्रणेला दिल्याचे सांगितले.

५० हजार हेक्टरमध्ये संत्राची फळगळ
कृषी विभागाच्या नजरअंदाज माहितीनुसार जिल्ह्यात किमान ५० हजार हेक्टरमध्ये संत्र्याच्या आंबियाची गळ झालेली आहे. अद्याप या नुकसानीचा अहवाल मात्र कृषी विभागाकडे नसल्याचे सांगण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना संत्रा उत्पादकांवर अन्याय होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

प्रत्यक्षात लेखी आदेश नसल्याने नाहीत. त्यामुळे करोडो रुपयांचा संत्रा मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी मातीमोल होत असल्याने शासनाने अर्थकारण संत्र्यावर असल्याने ते पडला आहे. पाहणी केली परंत पंचनामे केलेले पंचनाम्याचे आदेश द्यावेत. अशी हवालदिल झाले आहेत...

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान नसल्याने एनडीआरएफची मदत यामध्ये होऊ शकत नाही. जिल्हाधिकारी यांनी काही भागात पाहणीदेखील केलेली आहे. कृषी विभागाद्वारा अद्याप अहवाल आलेला नाही.
- डॉ. विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी
 

Web Title: climate change affects orange fruits in Vidharbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.