Lokmat Agro >शेतशिवार > Cloudburst Forecast : आता चार दिवस आधीच मिळणार ढगफुटीचा अंदाज; आयआयटीएमचा महासंगणक तयार

Cloudburst Forecast : आता चार दिवस आधीच मिळणार ढगफुटीचा अंदाज; आयआयटीएमचा महासंगणक तयार

Cloudburst Forecast : Cloudburst forecast will be available four days in advance; IITM mainframe ready | Cloudburst Forecast : आता चार दिवस आधीच मिळणार ढगफुटीचा अंदाज; आयआयटीएमचा महासंगणक तयार

Cloudburst Forecast : आता चार दिवस आधीच मिळणार ढगफुटीचा अंदाज; आयआयटीएमचा महासंगणक तयार

सध्या देशामध्ये अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस होत आहे. जुलै २०२२ मध्ये आणि त्यानंतरही पुणेकरांनीही पूरस्थिती अनुभवली आहे. अशी परिस्थिती येण्यापूर्वीच आता ३ ते ६ किमी अंतरावर ढगफुटी होणार असेल तर त्याची माहिती तीन-चार दिवसांअगोदर समजणार आहे.

सध्या देशामध्ये अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस होत आहे. जुलै २०२२ मध्ये आणि त्यानंतरही पुणेकरांनीही पूरस्थिती अनुभवली आहे. अशी परिस्थिती येण्यापूर्वीच आता ३ ते ६ किमी अंतरावर ढगफुटी होणार असेल तर त्याची माहिती तीन-चार दिवसांअगोदर समजणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : सध्या देशामध्ये अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस होत आहे. जुलै २०२२ मध्ये आणि त्यानंतरही पुणेकरांनीही पूरस्थिती अनुभवली आहे. अशी परिस्थिती येण्यापूर्वीच आता ३ ते ६ किमी अंतरावर ढगफुटी होणार असेल तर त्याची माहिती तीन-चार दिवसांअगोदर समजणार आहे.

'आयआयटीएम' संस्थेने 'अर्क' नावाचा महासंगणक बनवला आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन झाले. पुण्यामध्ये पाषाण येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) या संस्थेने हा महासंगणक तयार केला आहे. ही संस्था हवामान क्षेत्रात संशोधन करते.

या संस्थेने आतापर्यंत १२ किमी उंच किंवा लांब असलेल्या हवामानाचा अंदाज दिला आहे. पण, आता ३ ते ६ किमीपर्यंतचा हवामान अंदाज या महासंगणकामुळे देता येणे शक्य होणार आहे. एखाद्या भागात ढगफुटी होणार असेल तर लोकांना दोन दिवसांपूर्वी तशी सूचना देता येईल. जेणेकरून तेथील नुकसान कमी करता येणार आहे.

फायदा कोणाला होणार ?

ढगफुटी होणार असेल तर त्याची माहिती समजणार असल्याने वेळीच उपाययोजना करता येतील. त्याचा फायदा शेतकरी, नागरिकांना होणार आहे. आतापर्यंत १२ किमीवरील हवामान अंदाज देता येत होता. पण, या महासंगणकामुळे ३ ते ६ कि.मी. अंतरावरचे अंदाज देता येतील. चक्रीवादळ, अतिवृष्टी नेमक्या किती अंतरावर होणार आहे, तसेच गारपीट, उष्णतेच्या लाटा, दुष्काळ पडणार अहे का? यांचाही अंदाज किमान ३ ते ६ दिवस अगोदर देता येणार आहे.

महासंगणकावर रडार जे रीडिंग दाखवते, त्यावरून गणित अत्यंत वेगाने होईल. हे महासंगणक रडार आणि सॅटेलाइटच्या रीडिंगचे गणित काही क्षणांत सोडवेल. त्यामुळे दोन-तीन दिवसांचे काम अर्ध्या तासात होणार आहे. त्याची अचूकता प्रचंड आहे. त्यामुळे हवामानाचे अंदाज अचूक देता येतील. - डॉ. पानी मुरली कृष्णा, प्रमुख, आयआयटीएम, पुणे.

आमच्याशी व्हॉटअप्पद्वारे जोडण्यासाठी 'या' लिंकवर क्लिक करा.

Web Title: Cloudburst Forecast : Cloudburst forecast will be available four days in advance; IITM mainframe ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.