Lokmat Agro >शेतशिवार > कोको ४० टक्के महाग, प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात घट

कोको ४० टक्के महाग, प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात घट

Cocoa 40 percent more expensive, production reduced due to adverse weather conditions | कोको ४० टक्के महाग, प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात घट

कोको ४० टक्के महाग, प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात घट

कोकाे उत्पादकांना मिळताेय चांगला भाव, नागरिकांना चॉकलेट घेण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार..

कोकाे उत्पादकांना मिळताेय चांगला भाव, नागरिकांना चॉकलेट घेण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार..

शेअर :

Join us
Join usNext

बाहेर जेवायला जाणे किंवा रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करणे आता महाग होत चालले आहे. आता बाहेरून चॉकलेट ऑर्डर करणेही खिशाला भारी पडणार आहे. चॉकलेट बनवण्यासाठी लागणारे कोको ४० टक्के महागल्याने कंपन्या दर वाढवू शकतात. वर्षाच्या सुरुवातीपासून कोकोच्या किमती वाढून दशकभरातील उच्चांकी पोहोचल्या आहेत. त्यामुळे आता कंपन्या चॉकलेटची किंमत तीच ठेवून आकार कमी करू शकतात.

सध्या कोकोसाठी प्रति टन १० हजार डॉलर्सपेक्षा अधिक किंमत मोजावी लागते. जानेवारी-मार्च तिमाहीत कोकोच्या किमती मागील तिमाहीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाल्या आहेत.

का वाढताहेत भाव?

■ उत्पादकांनी मिल्क चॉकलेटचे उत्पादन थांबविले आहे, डार्क चॉकलेटच्या किमतीही वाढल्या आहेत. ग्राहकाच्या खिशावर किमतीचा ताण पडू नये म्हणून उत्पादक चॉकलेटच्या पॅकचा आकार कमी करण्याच्या विचारात आहेत.

■ गेल्या तिमाहीत कोको, कॉफी, पाम तेल आणि साखरेच्या किमती सातत्याने वाढत आहेत. सध्या, कोको आणि कॉफीच्या किमती सर्वकालिका उच्चांकावर आहेत.

■ पाम तेलाच्या दरातही वार्षिक आधारावर १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे रेस्टॉरंट आणि कॅफे चेन चालक चॉकलेटचे भाव वाढवण्याच्या विचारात आहेत.

■ कोकोच्या किमतीत या तीव्र वाढीला आयव्हरी कोस्ट या जगातील सर्वात मोठ्या कोको उत्पादक देशाकडून कमी झालेला पुरवठा हे प्रमुख कारण आहे.

■ पश्चिम आफ्रिकेतील प्रतिकूल हवामानामुळे स्थिती अधिकच गंभीर बनली आहे. त्यामुळे कोको उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

भारतात इथे होते सर्वाधिक कोको उत्पादन

कोको हे जगभरातील चॉकलेटसाठी घेतले जाणारे एक महत्त्वाचे लागवडीचे पीक आहे. भारतात कोकोची लागवड केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यांमध्ये 1,03,376 हेक्टर क्षेत्रामध्ये केली जाते. भारतातील कोकोची सरासरी उत्पादकता 669 किलो/हेक्टर आहे. आंध्र प्रदेश 39,714 हेक्टर क्षेत्रासह आणि 10,903 मेट्रिक टन उत्पादनासह प्रथम क्रमांकावर आहे.

Web Title: Cocoa 40 percent more expensive, production reduced due to adverse weather conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.