मुंबई : नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने ५ लाख ३० हजार ४५ शेतकऱ्यांना ५३५ कोटी ६५ लाख ७४ हजार ८९३ रुपयांची मदत वितरित केली आहे.
मदतीची ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. यात अहिल्यानगर जिल्ह्यातील २ हजार ९७५ शेतकऱ्यांना २ कोटी ५४ लाख ६५ हजार ९७० रुपये शेतकऱ्यांना मिळाले, असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
विभागाने शेतकऱ्यांचे ई-केवायसी त्वरित पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली, ज्यामुळे प्रलंबित प्रकरणांची पडताळणी जलद गतीने पूर्ण पूर्ण करण्यात आली. या धोरणात्मक उपक्रमामुळे बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत वितरण करणे शक्य झाले असल्याचे मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले.
मार्च २०२३ पासून ९ हजार ३०७ कोटी रुपये डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यात आले, असेही ते म्हणाले.
नगर जिल्ह्याला २ कोटी ५४ लाख रुपये
जळगाव जिल्ह्यातील ४ हजार २७४ शेतकऱ्यांना ५ कोटी ६५ लाख ५५ हजार ७३५ रुपये, नाशिक जिल्ह्यातील ५ हजार ४२ शेतकऱ्यांना ४ कोटी ४३ लाख ९८ हजार ६४२ रुपये, अहिल्यानगर जिल्ह्यातील २ हजार ९७५ शेतकऱ्यांना २ कोटी ५४ लाख ६५ हजार ९७० रुपये, धुळे जिल्ह्यातील ४८३ शेतकऱ्यांना ४६ लाख ८३ हजार ५५१ रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील १७ शेतकऱ्यांना २ लाख ७८ हजार ४६५ रुपये.
पुणे विभागात
कोल्हापूर जिल्ह्यातील ४३ हजार ३२१ शेतकऱ्यांना ३५ कोटी ८७ लाख १६ हजार ९४ रुपये, सोलापूर जिल्ह्यातील ३ हजार १३ शेतकऱ्यांना ४ कोटी २५ लाख ४ हजार २८७ रुपये, सांगली जिल्ह्यातील ५२२ शेतकऱ्यांना ५२ लाख १२ हजार ८०३ रुपये, पुणे जिल्ह्यातील ३९० शेतकऱ्यांना ३२ लाख ७४ हजार ४८९ रुपये आणि सातारा जिल्ह्यातील २७ शेतकऱ्यांना १ लाख १४ हजार ३७६ रुपये मदतीचा यामध्ये समावेश आहे.