Lokmat Agro >शेतशिवार > सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी महत्वाचे पाऊल, संपूर्ण यंत्रणेचे करणार संगणकीकरण

सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी महत्वाचे पाऊल, संपूर्ण यंत्रणेचे करणार संगणकीकरण

Computerization of the entire system is an important step for strengthening the cooperative sector | सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी महत्वाचे पाऊल, संपूर्ण यंत्रणेचे करणार संगणकीकरण

सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी महत्वाचे पाऊल, संपूर्ण यंत्रणेचे करणार संगणकीकरण

सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी संपूर्ण यंत्रणेचे संगणकीकरण आवश्यक असल्याचे सांगत अमित शहा यांनी पुण्यात केंद्रीय सहकार संस्थेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन केले. पिंपरी ...

सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी संपूर्ण यंत्रणेचे संगणकीकरण आवश्यक असल्याचे सांगत अमित शहा यांनी पुण्यात केंद्रीय सहकार संस्थेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन केले. पिंपरी ...

शेअर :

Join us
Join usNext

सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी संपूर्ण यंत्रणेचे संगणकीकरण आवश्यक असल्याचे सांगत अमित शहा यांनी पुण्यात केंद्रीय सहकार संस्थेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन केले. पिंपरी चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व इतर नेते उपस्थित होते.

देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा 42 टक्के असून महाराष्ट्राचे हेच योगदान दाखवण्यासाठी मी इथे आल्याचे अमित शहा म्हणाले.  देशातील पंधराशे 55 राज्य सहकारी समित्यांना याचा फायदा होईल. सहकार क्षेत्रातील कामाला गती आणणे आवश्यक आहे. हे आंदोलन आधुनिकतेशिवाय पुढे जाऊ शकत नाही. पारदर्शक व्यवस्थेतूनच ही गती येईल, असेही शहा म्हणाले. 

केंद्र किंवा राज्य सरकारकडून खरेदी केले जाणारे धान्य - गहू, ज्वारी, बाजरी, मका कोणत्याही अन्न विभागाच्या गोदामात जाणार नसून तुमच्या तहसीलात त्यानंतर स्वस्त धान्य दुकानात वितरित केला जाईल. सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या साठवणुकीच्या गोदामांमध्ये यंत्रांची ही व्यवस्था असेल. या सगळ्याचा फायदा महाराष्ट्राने घ्यायला हवा,असेही अमित शहा म्हणाले.

भारत सरकार तीन नव्या सहकारी संस्था बनवण्याचे काम करत आहे. बहुराज्य सेंद्रिय वस्तूंच्या विपणनासाठी एक सहकारी संस्था असेल. सेंद्रिय शेतीकडे अनेक शेतकरी वळले आहेत. त्यांना त्याचे प्रमाणपत्र नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या कामाचे मोल मिळत नाही.  सेंद्रिय दृष्ट्या बनवल्या जाणाऱ्या उत्पादनाचे, वस्तूंचे विपणन करत शेतकऱ्याच्या खाती त्या उत्पादनाचा मोबदला देण्याचं काम या सहकारी संस्था करतील.

शेतकरी त्यांच्या सर्वोत्तम दर्जाच्या उत्पादनाची निर्यात करू शकत ते कारण त्यांच्या उत्पादनावर माती असायची. यावर उपाय असा होता की पिकवलेल्या उत्पादनावर  मेनकापड अच्छादाजायचे होते. आता बहुराज्य निर्यात समिती या शेतकऱ्यांकडून हमाल खरेदी करेल व जगभरातील बाजारपेठेत विकेल. त्यातून मिळालेला नफा शेतकऱ्याच्या खात्यावर जाईल. 

 

Web Title: Computerization of the entire system is an important step for strengthening the cooperative sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.