Lokmat Agro >शेतशिवार > कापसावरील शेंदरी बोंड अळीला कसा कराल अटकाव

कापसावरील शेंदरी बोंड अळीला कसा कराल अटकाव

Control the pink bollworm on cotton | कापसावरील शेंदरी बोंड अळीला कसा कराल अटकाव

कापसावरील शेंदरी बोंड अळीला कसा कराल अटकाव

ही बोंडअळी बोंडाच्या आत राहून उपजिविका करते, बाहेरुन या किडीच्या प्रादुर्भावाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यासाठी वेळीच सावध होऊन शेंदरी बोंडअळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

ही बोंडअळी बोंडाच्या आत राहून उपजिविका करते, बाहेरुन या किडीच्या प्रादुर्भावाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यासाठी वेळीच सावध होऊन शेंदरी बोंडअळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

शेअर :

Join us
Join usNext

 शेंदरी बोडअळीचे  शास्त्रीय नाव Pectinophora gossypiella असून ही कपाशीवरील एक अतिशय हानीकारक कीड आहे. ही बोंडअळी बोंडाच्या आत राहून उपजिविका करते, बाहेरुन या किडीच्या प्रादुर्भावाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यासाठी वेळीच सावध होऊन शेंदरी बोंडअळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

बीटी कपाशीवरील शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भावाची कारणे :

  • कपाशीच्या फरदडीखाली क्षेत्रात वाढ.
  • जास्त कालावधीचे कपाशीचे संकरित वाण.
  • विविध प्रकारच्या कपशीच्या संकरित वाणाची मोठी संख्या.
  • कच्च्या कापसाची जास्त कालवधीपर्यत साठवणूक.
  • पिकाच्या अवशेषाची शेतात साठवणूक.
  • कपाशीची लवकर लागवड.
  • बीटी जनुकास प्रतिकारशक्ती.
  • आश्रय पिकाच्या ओळी न लावणे.
  • योग्य वेळी शेंदरी बोंडअळीचे व्यवस्थापन न करणे.
  • बीटी विषाचे प्रकटीकरण : शेंदरी बोंडअळी पाते, फुले व बोंडावर उपजिविका करते. बीटी विषाचे प्रकटीकरण कपाशीच्या पाते, फुले व बोंडामध्ये कमी प्रमाणात असते. त्याचबरोबर कोरडवाहु बीटी कपाशीमध्येसुध्दा बीटी विषाचे प्रकटीकरण कमी असते.
  • काही किटनाशके/किटकनाशकची मिश्रणे यांची फवारणी : कपाशीवर मोनोक्रोटोफॉस व अॅसिफेट ही किटकनाशके किंवा त्यांची मिश्रणे यांची फवारणी केल्यास कपाशीची कायिक वाढ होते. त्यामुळे फुले व बोंडे लागण्यामध्ये अनियमितता येते. त्यामुळे या किडीला सतत खाद्य उपलब्ध राहते.

एकात्मिक व्यवस्थापन :

  • कपाशीचे फरदड घेऊ नये.
  • हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये जनावरे किंवा शेळया, मेंढया, चरण्यासाठी सोडाव्यात.
  • शेतातील पिकांचे अवशेष वेचून जाळुन टाकावेत.
  • हंगाम संपल्यावर ताबोडतोब प­हाटीचा बंदोबस्त करावा. शेतात किंवा शेताजवळ प­हाटी रचून ठेवू नये.
  • पीक फेरपालट करावी. अंबाडी, भेंडी अशी पिके कपाशीपुर्वी किंवा नंतर घेऊ नयेत, त्यामुळे या बोंडअळीच्या जीवनक्रमात खंड पडेल.
  • आश्रय (रेफुजी) ओळी लावावे.
  • कामगंध सापळे आणि प्रकाश सापळयांचा वापर करावा. हंगामामध्ये हे सापळे शेतामध्ये आणि हंगाम संपल्यावर जिनींग मिलजवळ, बाजारामध्ये लावावेत.
  • प्रादुर्भावग्रस्त गळालेली पाते व बोंडे जमा करुन नष्ट करावेत.
  • डोमकळया दिसून आल्यास त्या तोडून आतील अळ्यासह नष्ट करावे.
  • कामगंध सापळयाचा वापर शेंदरी बोंडअळीचे पतंग मोठया प्रमाणात आकर्षित करणे आणि नर-मादी मिलनामध्ये अडथळा आणणे यासाठी करता येतो (१० सापळे / एकर ).
  • कमी कालावधीचे (१५० ते १६० दिवस) आणि एकाच वेळी जवळपास वेचणी करता येणाऱ्या संकरित वाणाची लागवड करावी.
  • ट्रायकोग्रॉमाटॉयडीया बॅक्ट्री या परोपजीवी किटकांचे कार्ड (१.५ लाख अंडी/हे.) पिकावर लावावेत.
  • आर्थिक नुकसानीची पातळी : ८-१० पतंग प्रति सापळा सलग ३ रात्री किंवा ५ ते १० टक्के प्रादुर्भावग्रस्त हिरवी बोंडे. (२० पैकी १ ते २ हिरवे बोंड प्रादुर्भावग्रस्त असल्यास) ही पातळी ओलांडल्यानंतर खालील रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.
     

Web Title: Control the pink bollworm on cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.