Lokmat Agro >शेतशिवार > भरडधान्याची खिचडी शिजवा आणि जिंका आकर्षक बक्षीसे, अशी आहे स्पर्धा

भरडधान्याची खिचडी शिजवा आणि जिंका आकर्षक बक्षीसे, अशी आहे स्पर्धा

Cook bharadhanya millet khichdi and win attractive prizes, this is the competition | भरडधान्याची खिचडी शिजवा आणि जिंका आकर्षक बक्षीसे, अशी आहे स्पर्धा

भरडधान्याची खिचडी शिजवा आणि जिंका आकर्षक बक्षीसे, अशी आहे स्पर्धा

चवदार खिचडी बनवा आणि पाच हजारांचे बक्षीस मिळवा, अशी ही स्पर्धा असून शाळांमधून आयोजित स्पर्धांमध्ये उत्साह दिसत आहे. शासनाच्या या स्पर्धेमुळे ज्वारी बाजरी व अन्य तृणधान्यापासून कोणाची खिचडी भाकरी चवदार लागते.

चवदार खिचडी बनवा आणि पाच हजारांचे बक्षीस मिळवा, अशी ही स्पर्धा असून शाळांमधून आयोजित स्पर्धांमध्ये उत्साह दिसत आहे. शासनाच्या या स्पर्धेमुळे ज्वारी बाजरी व अन्य तृणधान्यापासून कोणाची खिचडी भाकरी चवदार लागते.

शेअर :

Join us
Join usNext

दैनंदिन आहारात तृणधान्यांचा वापर आणि त्याचे महत्त्व समाजापर्यंत रुजवण्यासाठी शाळा केंद्र आणि तालुकास्तरावर पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. चवदार खिचडी बनवा आणि पाच हजारांचे बक्षीस मिळवा, अशी ही स्पर्धा असून शाळांमधून आयोजित स्पर्धांमध्ये उत्साह दिसत आहे. शासनाच्या या स्पर्धेमुळे ज्वारी बाजरी व अन्य तृणधान्यापासून कोणाची खिचडी भाकरी चवदार लागते. कोणाचे थालीपीठ खमंग लागते, याशिवाय तृणधान्यापासून इडली, ढोकळे, लाडू कोण करते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच तृणधान्य युक्त आहाराची सवय लावण्यासाठी या पाककृतीचे आयोजन करण्यात आले आहे.

परसबागेत वांगी मिरची पालेभाज्या कोथिंबीर वेलवर्गीय भाज्यांची लागवड करून भाज्यांचा वापर पोषण आहारात करून मुलांना चविष्ट आहार देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. तालुकास्तरावरील प्रथम विजेत्या क्रमांकाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार जिल्हास्तरावरील विजेत्यांची आहे. निवड राज्य स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. शिक्षकही पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मदतीने परसबागेत भाज्यांची लागवड करू लागले आहेत.

पोषण महिना
जंक फूड खाण्याच्या सवयीमुळे आहारात पौष्टिक तृणधान्यांचा वापर कमी होत चालला आहे. जागृतीसाठी प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत हा महिना पोषण महिना म्हणून साजरा केला जातो.

पाककृती स्पर्धा
प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेअंतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे होत आहे. शाळा, केंद्र, तालुकास्तरावर पाककृती स्पर्धा होत आहेत. विजेत्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत.

अडीच हजारांपासून पाच हजारांपर्यंत बक्षीस
शाळा स्तरावरील प्रथम क्रमांकाच्या पाककृतीची स्पर्धा तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पाककृतीसाठी प्रथम ५ हजार, द्वितीय ३ हजार ५०० आणि तृतीय २ हजार ५०० रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. यातून जनजागृतीवर दिला जात आहे.

करायचे काय?
आरोग्यविषयक लाभासाठी, तृणधान्यांची चव, मांडणी आणि नावीन्यपूर्ण पाककृती बनवण्याची कृती सुलभता व इंधन बचत यासाठी प्रत्येकी १० असे एकूण ५० गुणांची ही स्पर्धा आयोजित केली आहे.

कोणाला सहभाग घेता येईल?
शाळेतील माता पालक नागरिक व योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना तृणधान्यावर आधारित पाककृती स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. एका उत्कृष्ट पाककृतीची निवड तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.

पाककलेतील कौशल्य सादर करण्याची संधी या स्पर्धेमुळे मिळाली आहे. शाळांमध्ये पाककृती स्पर्धेत तृणधान्यांचा वापर केलेले पदार्थ बनवून उत्कृष्ट मांडणी व सजावट करावयाची असल्याने स्पर्धक उत्साहात आहेत. उत्कृष्ट पाककृतीला शासनाच्या निर्देशानुसार तीन पारितोषिके दिली जाणार आहेत. - शबनम मुजावर, शिक्षणाधिकारी

Web Title: Cook bharadhanya millet khichdi and win attractive prizes, this is the competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.