Lokmat Agro >शेतशिवार > कापसाला निंदणी अन् खतपाणी; यंदा भाव काय मिळणार कोणाच्या ध्यानी!

कापसाला निंदणी अन् खतपाणी; यंदा भाव काय मिळणार कोणाच्या ध्यानी!

Cotton ginning and fertilizing; Who will get the price this year? | कापसाला निंदणी अन् खतपाणी; यंदा भाव काय मिळणार कोणाच्या ध्यानी!

कापसाला निंदणी अन् खतपाणी; यंदा भाव काय मिळणार कोणाच्या ध्यानी!

जळगावात साडेपाच लाख हेक्टरवर कापसाची पेरणी : जिल्ह्यात ९५ टक्के पेरण्या

जळगावात साडेपाच लाख हेक्टरवर कापसाची पेरणी : जिल्ह्यात ९५ टक्के पेरण्या

शेअर :

Join us
Join usNext

गेल्या वर्षाच्या हंगामात कापसाला शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला भाव मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक महिने आपल्या घरातच कापूस ठेवला होता. गेल्यावर्षी भाव न मिळाल्याने, यंदा कापसाच्या लागवड क्षेत्रात घट होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती; मात्र यंदा देखील कापसाची १११ टक्के पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात तब्बल ५ लाख ५८ हजार ७८० हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात कापसाची ५ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रावर सरासरी पेरणी होत असते; मात्र यावर्षी गेल्या वर्षाप्रमाणेच सरासरीपेक्षाही अधिक कापसाची पेरणी झाली आहे. यंदा कापसाच्या हमीभावात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामळे शेतकऱ्यांचा कल कापूस लागवडीकडे अधिक असल्याचे चित्र आहे. दरम्यान, जिल्ह्यात जवळपास खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी ९५ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ७ लाख ३८ हजार ५२० हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत.


पीकनिहाय झालेल्या पेरण्या

पीकनिहाय झालेल्या पेरण्या
पीक

झालेली पेरणी (हेक्टरमध्ये)

कापूस 

५ लाख ५८ हजार

मका८६ हजार १९९ 
तूर

१० हजार ८२५

मूग

१३ हजार ७८७

 

Web Title: Cotton ginning and fertilizing; Who will get the price this year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.