Join us

Cotton Market Update: कापुस उत्पादकांनो! सीसीआय खरेदी होणार पुन्हा सुरळीत वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 14:35 IST

CCI Procurement : मराठवाड्याच्या विविध कापूस खरेदी केंद्रात नोव्हेंबर महिन्यापासून कापूस खरेदी सुरू आहे. परंतू १० फेब्रुवारीपासून सीसीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये काही त्रुटी असल्याने तुर्तास तरी कापूस खरेदी बंद करण्यात आली असल्याची माहिती एका पत्रकाद्वारे देण्यात आली होती.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या विविध कापूस खरेदी केंद्रात (CCI Procurement) नोव्हेंबर महिन्यापासून कापूस खरेदी सुरू आहे. परंतू १० फेब्रुवारीपासून सीसीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये (Softwar) काही त्रुटी असल्याने तुर्तास तरी कापूस खरेदी बंद करण्यात आली असल्याची माहिती एका पत्रकाद्वारे देण्यात आली होती.

सोयाबीन उत्पन्नातून लागवड खर्चही वसूल झाला नसलेल्या शेतकऱ्यांना कापसाकडून खुप अश्या होत्या. परंतु उत्पादनात झालेली घट आणि पडता भाव यामुळे कापूस उत्पादक (Cotton growers) शेतकरी संकटात सापडला आहे.

खुल्या बाजारापेक्षा काही प्रमाणात का होईना सीसीआय केंद्रावर वाढीव भाव मिळला; परंतु जागेअभावी दोन ते तीन वेळा या केंद्रात कापूस खरेदीला 'ब्रेक' लागला. आता सर्व्हरचा अडथळा निर्माण झाल्याने पुन्हा कापूसकोंडी झाली असून, तात्पुरत्या स्वरूपात खरेदी बंद केली आहे.

मराठवाड्यात 'सीसीआय'चे कापूस खरेदी केंद्र ९ नोव्हेंबरपासून सुरू झाले. या केंद्राला यंदा प्रचंड प्रतिसाद मिळाला. खुल्या बाजारातील पडत्या भावामुळे शेतकऱ्यांनी (Farmer) सीसीआय केंद्रावर कापूस विक्री करणे पसंत केले.

काही प्रमाणात अटींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला; परंतु वाढीव भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा सीसीआय केंद्राकडे वाढताना दिसत आहे.

सीसीआयने १० फेब्रुवारी रोजी एका पत्र जारी केले. या पत्रात असे नमुद करण्यात आले आहे की, सॉफ्टवेअरच्या तांत्रिक बिघाडामुळे तुर्तास कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील सुचना येईपर्यंत कापूस विक्री करण्यासाठी घेऊ येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

याचा फायदा घेत  ग्रामीण भागात कापूस खरेदीदार व्यापारी एक अफवा पसरवत होते ज्यात आता सीसीआय (CCI) कापूस खरेदी होणार नाही. त्यामुळे कापूस विकून टाका आणि सोबत या पत्रामुळे खाजगी व्यापारी कमी दरात कापूस खरेदी करत होते. परंतू यावर शेतकऱ्यांनी विश्वास न ठेवण्याचे आवाहन सीसीआयने केले आहे.

उत्पादकांची धाकधूक वाढली

* 'सीसीआय'च्या वतीने शेवटच्या बोंडापर्यंत कापूस खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे; परंतु तो कापूस दर्जेदार असणे आवश्यक आहे. वास्तविक डिसेंबरमध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाचा दर्जा खालावला.

* काही प्रमाणात भाव कमी करून सीसीआयने कापूस खरेदी सुरू ठेवली. अजूनही ही खरेदी सुरू आहे; परंतु आता सर्व्हरचा अडथळा आल्याने पुन्हा तात्पुरत्या स्वरूपात खरेदी बंद ठेवण्यात येणार आहे.

* पुन्हा एकदा कापूस खरेदी बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. तर दुसरीकडे सीसीआयच्या निर्णयामुळे खुल्या बाजारात भाव आणखी पडले आहेत.

* आता कापसाचा शेवटचा टप्पा सुरू असून, काही शेतकऱ्यांकडेच कापूस शिल्लक आहे; परंतु आता यंत्रणेकडून सर्व्हरचा अडथळा येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ११ फेब्रुवारीपासून पुढील सूचनेपर्यंत 'सीसीआय'चे कापूस खरेदी केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

क्लाउड बेस सॉफ्टवेअर असल्याने त्यात काही त्रुटी निर्माण झाल्या आहेत. ज्या दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून सॉफ्टवेअर सेवा सुरळीत होताच कापूस खरेदी पुन्हा सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणी सांगत असेल की, कापूस खरेदी आता होणार नाही तर यावर विश्वास ठेवू नये. - स्वप्नील वी. दडमल, उप महा. प्रबंधक भारतीय कापूस निर्गम, छत्रपती संभाजीनगर

येथे सुरू आहे कापूस खरेदी

वैजापुर, पाचोड, लासुर, गंगापुर, सिलोड, फुलंब्री, खामगाव, जालना, मंठा, बदनापुर, भोकरदन, परतुर, धनसांवगी, शहागड, बालानगर, राजुर, परभणी, बोरी, मानवत, सेलु, जिंतूर, ताडकलस, गंगाखेड, पाथरी, गेवराई, बीड, वडवणी, किनवट, माजलगाव, केज, धारूर, परळी वैजनाथ, हिंगोली, जावळाबाजार, वसमत, बोदवड, जामनेर, पाचोरा, एरंडोल, जळगाव, चोपडा, भुसावळ, शेन्दुर्णी, चाळीसगाव, पारोला, धरणगाव, शाहदा, नंदुरबार, नवापुर, दोण्डाईचा, शिंदेखेडा, शिरपुर, धुळे, धर्माबाद, नायगाव, नांदेड, कुन्टुर, तामसा, भोकर, शेवगाव, मिरजगाव या ठिकाणी होत आहे कापूस खरेदी.

हे ही वाचा सविस्तर : Cotton Market : 'सीसीआय'कडून कापूस खरेदीला येत आहेत 'या' अडचणी वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड