Lokmat Agro >शेतशिवार > Cotton: रिक्षाची सोय करा..., तरच कापूस वेचायला येऊ

Cotton: रिक्षाची सोय करा..., तरच कापूस वेचायला येऊ

Cotton picking rate at Rs 11, due to labour shortage issue in Marathwada region | Cotton: रिक्षाची सोय करा..., तरच कापूस वेचायला येऊ

Cotton: रिक्षाची सोय करा..., तरच कापूस वेचायला येऊ

Cotton picking season: कापूस वेचणी यंदा आणखीनच महागली असून मजूर टंचाईमुळेही शेतकरी हैराण झालेले आहे. अनेक ठिकाणी मजूर रिक्षासारख्या वाहनाची मागणी शेतकऱ्यांकडे करत आहेत.

Cotton picking season: कापूस वेचणी यंदा आणखीनच महागली असून मजूर टंचाईमुळेही शेतकरी हैराण झालेले आहे. अनेक ठिकाणी मजूर रिक्षासारख्या वाहनाची मागणी शेतकऱ्यांकडे करत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

Cotton Picking rate, गेवराई  तालुक्यात सध्या कपाशीचे पीक जोमात आले असून, वेचणी सुरू झाली आहे. मात्र, कापूस वेचणीसाठी शेतकर्चयांवर मजूर शोधण्याची वेळ आली आहे. महिला मजुरांना ने-आण करण्याकरिता रिक्षा लावून व ११ रुपये किलो दराने वेचणीची मजुरी देऊन घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी परेशान झाला आहे.

गेवराई तालुक्यातील १३ महसूल मंडळांत यावर्षी वेळोवेळी चांगला पाऊस पडला. त्यामुळे पिके जोरदार आली होती. सप्टेंबरमधील पावसामुळे कापूस पिकाचे नुकसान झाले. यातच आता कापसाची वेचणी सुरू झाली आहे. वेचणीला मजूर महिलांना गावोगावी फिरावे लागत आहे. त्यामुळे मजूर महिला मिळणे कठीण होत आहे. मजूर महिलेला ११ रुपये किलो दराप्रमाणे वेचणीची मजुरी देऊन, तसेच त्यांना ने-आण करण्याकरिता रिक्षा, वाहनांची सोय करून नेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी परेशान झाला असल्याचे राजपिंबरी येथील शेतकरी देवीदास भोसले यांनी सांगितले.

सध्या कापूस वेचणीला महिला मजूर मिळणे कठीण होत आहे. महिला मजुरांना ११ रुपये किलो दराने वेचणीचे पैसे देऊन त्यांना घरापासून ते शेतापर्यंत ने - आण करण्याकरिता रिक्षा लावून ने-आण करण्याची वेळ आल्याचे गौडगाव येथील शेतकरी सुनील देशमुख यांनी सांगितले, तर शेतकऱ्याला मजूर आणण्यासाठी गावोगावी फिरावे लागत असल्याचे अंतरवाली येथील शेतकरी विजय शिनगारे यांनी सांगितले.

Web Title: Cotton picking rate at Rs 11, due to labour shortage issue in Marathwada region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.