Join us

Cotton-Soybean Anudan : कापूस सोयाबीन अनुदानापासून ४७ लाख शेतकरी वंचित का? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 7:43 PM

Cotton Soybean Anudan : आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील ४९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे वर्ग करण्यात आले.

Cotton Soybean Anudan : मागच्या वर्षातील म्हणजेच २०२३च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादनात कमी पावसामुळे, नैसर्गित आपत्तीमुळे मोठी घट झाल्यामुळे या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५ हजार रूपयांचे अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली होती. तर राज्यातील एकूण ९६ लाख पात्र शेतकऱ्यांपैकी ४९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज २ हजार ३९८ कोटी रूपये वर्ग करण्यात आले आहेत. पण अद्यापही ४७ लाख शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले आहेत. 

दरम्यान, राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक असलेल्या ९६ लाख खातेधारकांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. तर त्यातील ६८ लाख शेतकऱ्यांचे आधार संमतीपत्र कृषी विभागाकडे आले आहे. तर त्यातील ४७ लाख शेतकऱ्यांचे आधार क्रमांक नमो शेतकरी महासन्मान निधीमुळे जुळलेले आहेत. दोन लाख शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली आहे. तर ई-केवायसी किंवा आधार लिंक न केल्यामुळे राज्यातील ४७ लाख शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. 

ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली आहे अशा ४९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज २ हजार ३९८ कोटी रूपये राज्य सरकारने वर्ग केले आहेत. पण जे शेतकरी पात्र असूनही त्यांना अनुदानाचे पैसे मिळाले नाहीत अशा शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. कारण अशा शेतकऱ्यांनाही अनुदानाचे पैसे मिळणार आहेत.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केवायसी न झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांच्या आधार व अन्य माहितीची जसजशी जुळणी होत राहील तसं तसे या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीमहाराष्ट्र