Join us

शेतकरी बांधवांनो, क्रेडिट कार्ड वापरत असाल तर हे 9 फायदे घेताय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 3:41 PM

क्रेडिट कार्डाचा पुरेपूर वापर व्हावा यासाठी त्यावर नेमक्या कोणकोणत्या सुविधा दिल्या जात आहेत? जाणून घ्या..

जवळ असलेले पैसे खर्च अजिबात न करता आवडेल त्या वस्तू खरेदी करण्याची सुविधा क्रेडिट कार्डामुळे मिळत असते. विमान प्रवास, सिनेमाचे तिकीट यांची खरेदी तसेच हॉटेलचे बिल भरण्यासाठी क्रेडिट कार्ड मोठ्या प्रमाणात वापरले जात असतात.

केलेल्या खर्चाची चुकवणी कोणतेही शुल्क न भरता दिलेल्या मुदतीत करावी लागत असते. क्रेडिट कार्ड अनेकजण वापरत असले तरी त्यावर अन्य कोणकोणते फायदे दिले जात असतात, याची माहिती सर्वांना नसते. त्यामुळे क्रेडिट कार्डाचा पुरेपूर वापर व्हावा यासाठी त्यावर नेमक्या कोणकोणत्या सुविधा दिल्या जात आहेत, याची माहिती असणे गरजेचे आहे.

■ वेलकम बोनस 

क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर बँकांकडून युजरला दिलेल्या मुदतीत विशिष्ट किमतीची खरेदी केली असता, वेलकम बोनस इन्स्टंट कॅश किंवा कॅशबॅक म्हणून दिला जात असतो.

■ रिवार्ड पॉइंट्स

क्रेडिट कार्डवर केल्या जाणाऱ्या प्रत्येक खरेदीवर विशिष्ठ प्रमाणात रिवार्ड पॉइंट्स युजर्सना दिले जात असतात. यातून व्हॉऊचर किंवा विविध वस्तू खरेदी करण्याची सुविधा मिळत असते.

■ रिहम्पशन ऑप्शन

कार्डच्या सहाय्याने केलेल्या प्रत्येक खरेदीवर जमा झालेल्या रिवार्ड पॉइंट्सचे रूपांतर डिनर, कॅशबॅक, ट्रॅव्हल बुकिंग, भेटवस्तू, स्टेटमेंट क्रेडिट आदींमध्ये करून दिले जात असते.

■ फ्युएल रिवार्ड्स

कोणत्याही वाहनासाठी पंपावर केलेल्या पेट्रोल, डिझेल खरेदीवर यूजरला काही सवलत किंवा कॅशबॅक दिला जातो.

■ कॅशबॅक ऑफर्स 

कार्डवर केलेल्या वस्तू वा सेवा खरेदीच्या एकूण रकमेच्या काही टक्के रक्कम तुमच्या खात्यात वळती केली जाते.

■ माइल्स

मोठ्या प्रमाणावर विमान प्रवास करणाऱ्यांना ही सुविधा दिली जाते. या पॉइंट्सचा फायदा कार्डधारकांना हॉटेलचे बुकिंग तसेच कार बुकिंगमध्ये सवलतीच्या रूपात दिला जात असतो.

■ लाइफस्टाईल

हॉटेलिंग, सिनेमागृह तसेच मनोरंजन केंद्रांवर केलेली खरेदी आदींवर काही सवलती किंवा कॅशबॅक ऑफर केल्या जाते.

■ बोनस कॅटेगरी

मोठ्या रकमेच्या खरेदीवर ही सुविधा दिली जाते. किराणा भरणे, मोठ्या रेस्टॉरंटमधील खर्च, महागड्या वस्तूंची खरेदी यावर पुरस्कार म्हणून बोनस दिला जात असतो. हा लाभ कॅशबॅक किंवा मोठ्या सवलतीच्या रूपात मिळतो.

■ मेंबरशिप फी

कोणत्याही कार्डच्या वर्षभराच्या वापरासाठी फी आकारली जात असते. काही बँका अजिबात शुल्क घेत नाहीत. दिलेल्या सेवासुविधांनुसार हे शुल्क बँकनिहाय कमीअधिक असते.

टॅग्स :बँकशेतकरीपैसा