गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या भावात घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.खामखेडा परिसरातील सावकी, विठेवाडी, भऊर, पिळकोस, भादवण, विसापूर, बिजोरे आदी परिसरात विहिरींना भरपूर पाणी राहत असे. तेव्हा या परिसरात उसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात असे. परंतु नंतर पावसाने प्रमाण कमी होऊ लागल्याने जलाशयातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने विहिरीचे पाणी कमी झाले.प्रत्येक पिकावर तणनाशक बाजारात आली. विहिरीचे पाणी कमी झाल्याने शेतकरी भागामध्ये गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वी डाळिंब पिकाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात होती. परंतु गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी डाळिंब पिकांवर तेल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने डाळिंबाची शेती तोट्यात येऊ लागल्याने शेतकऱ्याने डाळिंबाची झाडे उपटून काढली.चालू वर्षी पाऊस उशिरा पडल्यामुळे लाला कांद्याची उशिरा लागवड झाल्याने लाल कांदा उशिरा तयार होऊन बाजारात आला आणि सरकार कांद्यावर निर्यात बंदी केल्याने दिवसेंदिवस लाल कांद्याचे भाव कमी कमी होत आहेत. शेतकऱ्यांनी लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली.कांद्याचे भाव स्थिर होते. सुरुवातीला लाल कांद्याला चांगल्या पैकी भाव होतात. परंतु कांद्याचे जास्त भाव वाढू नये म्हणून केंद्र सरकारने निर्यात बंदी केल्याने कांद्याच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत चालली आहे. आता साधारण पंधरा ते वीस दिवसांत रांगडा लाल कांदा काढणीचा खरा हंगाम सुरू होणार आहे. या कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन येते. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या भावात घसरण होत आहे.डाळिंबाच्या क्षेत्रामध्ये झाली घट
डाळिंबाची शेती कमी होऊन कांद्याच्या क्षेत्रात वाढ झाली. आता शेतकऱ्याकडे कांदा हे एकमेव उत्पादनाचे साधन राहिले. तेव्हा शेतकरी कांदा पिकाकडे वळला, कांदा या पिकाकडे हमखास पैसे देणारे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून कांद्याला चांगला भाव मिळत नव्हता, त्यामुळे कांद्याचे पीक तोट्यात येत असे. परंतु गेल्यावर्षी उन्हाळी काढणीचा हंगामात कांद्याला पाहिजे त्या प्रमाणात भाव नव्हता. तेव्हा काही शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने कांदा विकावा लागला.