Lokmat Agro >शेतशिवार > Crop Competition: खरिपात उत्पादन जास्त काढा अन् कृषी विभागाकडून बक्षिस मिळवा! पिकस्पर्धेचे आयोजन

Crop Competition: खरिपात उत्पादन जास्त काढा अन् कृषी विभागाकडून बक्षिस मिळवा! पिकस्पर्धेचे आयोजन

Crop Competition Organization of intra-state crop competition for food grains, pulses and pulses by the Department of Agriculture. | Crop Competition: खरिपात उत्पादन जास्त काढा अन् कृषी विभागाकडून बक्षिस मिळवा! पिकस्पर्धेचे आयोजन

Crop Competition: खरिपात उत्पादन जास्त काढा अन् कृषी विभागाकडून बक्षिस मिळवा! पिकस्पर्धेचे आयोजन

Crop Competition : याही वर्षी ११ पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मान कृषी विभागाकडून करण्यात येणार आहे. 

Crop Competition : याही वर्षी ११ पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मान कृषी विभागाकडून करण्यात येणार आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. त्याचबरोबर राज्याच्या कृषी विभागाकडून  शेतकऱ्यांना पीक उत्पादनामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. तर याही वर्षी ११ पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मान कृषी विभागाकडून करण्यात येणार आहे. 

(Agriculture Department Crop Competition)

दरम्यान, या वर्षी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, मुईमुग, सुर्यफुल या ११ पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना या पीक स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे. 

पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 
मूग व उडीद पिकासाठी -
३१ जुलै 
भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी - ३१ ऑगस्ट

पिकस्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी : 

  • स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रु. १५० राहिल.
  • स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.
  • पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर (१ एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
  • पिकस्पर्धा तालुका स्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत बरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.


अर्ज कोठे करावा व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -

१) विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)
२) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन
३) ७/१२, ८-अ चा उतारा
४) जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास)
५) पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा
६) बैंक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत

पिकस्पर्धा बक्षिसाचे स्वरूप सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीस रक्कम 

दरम्यान, या पीक स्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचा आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. 

Web Title: Crop Competition Organization of intra-state crop competition for food grains, pulses and pulses by the Department of Agriculture.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.