Lokmat Agro >शेतशिवार > Crop Damage : परतीच्या पावसाचा धुमाकूळ, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला!

Crop Damage : परतीच्या पावसाचा धुमाकूळ, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला!

Crop Damage : Due to heavy rainfall crop has damage | Crop Damage : परतीच्या पावसाचा धुमाकूळ, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला!

Crop Damage : परतीच्या पावसाचा धुमाकूळ, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला!

Crop Damage ; ऑक्टोबरमधील परतीच्या पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

Crop Damage ; ऑक्टोबरमधील परतीच्या पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : यंदा वेळेवर दाखल झालेल्या मान्सूनने खरिपातील पेरण्या साधल्या. मात्र, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर तसेच ऑक्टोबरमधील परतीच्या पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

त्यामुळे खरीप पिक विमा काढलेल्या राज्यातील शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे नुकसान भरपाईसाठी सुमारे ७६ लाख ३६ हजार तक्रारी अर्थात दावे दाखल केले आहेत.

या सर्वेक्षणाचे क्षेत्रीय पातळीवर सुरू असून नुकसान भरपाईबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. सर्वाधिक १० लाख तक्रारी एकट्या बीड जिल्ह्यातून आल्या आहेत.

राज्यात यंदा पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत १ कोटी ६५ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. ऑक्टोबरमध्ये आलेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे आणखीन नुकसान झाले. त्यामुळे हातात तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला. त्यामुळेच नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे तब्बल ७६ लाख ३६ हजार ८६७ तक्रारी दाखल आहेत.

शंभर टक्के नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षणाची गरज

■ याबाबत आवटे म्हणाले, "नुकसानीचे सर्वेक्षण क्षेत्रीय पातळीवर सुरू आहे. विमा संरक्षित क्षेत्राच्या पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर नुकसान झाले असल्यास नुकसानाची तीव्रता जास्त असल्याचे गृहीत धरून सरासरी ३० टक्के नुकसानग्रस्त नमुन्यांचे सर्वेक्षण केले जाते. यातून आलेल्या नुकसानीची सरासरी काढून त्याचा भरपाई दावा काढण्यात येईल.

■ त्यानुसार सर्व क्षेत्रावरील शेतकऱ्यांचे समान नुकसान झाल्याचे गृहित धरण्यात येते. त्यामुळे सर्व शंभर टक्के नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याची गरज भासत नाही.

■ राज्यात ही स्थिती सर्वदूर आहे. या नुकसानीचा अहवाल तालुका स्तरावरील समितीकडून जिल्हास्तरावर पाठविला जाईल. त्यानंतर राज्यस्तरावर त्या संदर्भात निर्णय घेऊन नुकसान भरपाईबाबत सरकारकडे अहवाल सादर करण्यात येईल. त्यानुसार विमा कंपन्यांना नुकसान भरपाईसाठी आदेश देण्यात येतील.

■ शेतकऱ्यांना या तक्ररी ऑनलाईन व ऑफलाईनही करता येतात. त्यात ७६ लाख २० हजार २४४ तक्रारी ऑनलाईन आल्या आहेत. सर्वाधिक १० लाख ८७ हजार ९४४ तक्रारी एकट्या बीड जिल्ह्यातून आल्या आहेत. त्या खलोखाल ८ लाख ९ हजार २३५ तक्रारी नांदेड जिल्ह्यातून आल्या आहेत. या पावसाचा सर्वात मोठा फटका उडीद, मूग, सोयाबीन, कापूस, भाजीपाला बाजरी या पिकांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.

पावसाचा धुमाकुळ

नाशिक/जळगाव / नागपूर : राज्यात परतीच्या पावसाने राज्याच्या बहुसंख्य भागात धुमाकूळ घातला असून, पिकांची नासाडी केली आहे. विशेषतः खान्देशातील जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. त्यातच हवामान खात्याने आणखी दोन दिवस पावसाचा अलर्ट जारी केला आहे.

■ गुरुवारपासून नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने देवळा आणि सुरगाणा येथे पिकांसह घरांचे नुकसान केले आहे. कांदा आणि भात पिकासाठी हा पाऊस नुकसानदायक असून, जिल्ह्यातील धरणांमधून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

वीज पडून ११ वर्षीय बालक ठार

जळगाव : जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी रात्री झालेल्या परतीच्या वादळी पावसाने केळी, मका, कपाशी, सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर अंगावर वीज पडल्याने एका ११ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.

जिल्हानिहाय पीक विम्याच्या तक्रारी

 

जिल्हा                         तक्रारीच्या संख्या
नगर                                  २६४७७९
नाशिक                                 ७३९०१
भंडारा                               १८६५६
सोलापूर                           १९८०७४
पालघर                  २६७०
चंद्रपूर                       ८७९३७
रायगड ६७७
वाशिम        २८०६४३
बुलढाणा४४५११९
सांगली१५७२७
नंदुरबार२९९४४
बीड १८८२७०
हिंगोली४९३६००
धुळे६८४१०

अकोला

२६८५०४
पुणे६३२२
धाराशिव५५०१६३
यवतमाळ३९०३१३
अमरावती१०९६५७
गडचिरोली३४४४
लातूर७४२८२
जळगाव१३२४२२
सातारा२४६७
परभणी७१५३४९
वर्धा१८८२७०
नागपूर९१६२३
जालना४३५६७२
गोंदिया३१७
कोल्हापूर५९२६
ठाणे३७
रत्नागिरी४२
सिंधुदुर्ग६१
नांदेड८०९३२५
संभाजीनगर७८४५९०

Web Title: Crop Damage : Due to heavy rainfall crop has damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.