Lokmat Agro >शेतशिवार > Crop Damage : ऐन हंगामात वादळी पावसाने झोडपले; वादळाने छप्पर उडाले, झाडे कोसळली

Crop Damage : ऐन हंगामात वादळी पावसाने झोडपले; वादळाने छप्पर उडाले, झाडे कोसळली

Crop Damage : stormy rains lashed during the season in yavatmal | Crop Damage : ऐन हंगामात वादळी पावसाने झोडपले; वादळाने छप्पर उडाले, झाडे कोसळली

Crop Damage : ऐन हंगामात वादळी पावसाने झोडपले; वादळाने छप्पर उडाले, झाडे कोसळली

परतीचा पाऊसही शुक्रवारपासून यवतमाळ जिल्ह्यात थैमान घालू लागला आहे. (Crop Damage)

परतीचा पाऊसही शुक्रवारपासून यवतमाळ जिल्ह्यात थैमान घालू लागला आहे. (Crop Damage)

शेअर :

Join us
Join usNext

Crop Damage :

यवतमाळ/ दारव्हा : परतीचा पाऊसही शुक्रवारपासून जिल्ह्यात थैमान घालू लागला आहे. शेतशिवारात सोयाबीनचे पीक काढण्याचा हंगाम सुरू आहे. यातच वादळी वाऱ्यासह पाऊस बरसत आहे. यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचा माल बाजार समितीत उघड्यावर असल्याने भिजून खराब झाला.

दारव्हा तालुक्यातील धामणगावला (देव) शनिवारी वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले, अर्धा तास सुसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळल्याने शेती पिकांसह घरांचे नुकसान झाले.

झाड उन्मळून पडल्याने दुचाकी तसेच देवस्थानच्या भक्त निवासाची ही पडझड झाली आहे. शनिवारी(२० ऑक्टोबर) रोजी दुपारी पावसाला सुरुवात झाली व काही वेळातच रौद्र रूप धारण केले.

अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची गंजी करून ठेवले होती, पावसाचा अंदाज बघता ताडपत्रीने झाकले होते, परंतु सुसाट्याच्या वारा सुटल्याने ताडपत्री उडाल्या, त्यामुळे सोयाबीन पूर्णपणे भिजले, त्याचबरोबर कपाशी, तूर जमिनदोस्त झाल्या असून वादळी पावसाचा मोठा
फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

तसेच अनेक घरावरील टिनपत्रे उडाली, कुडाची घरे पडली, दुचाकीवर झाडे पडल्याने नुकसान झाले. धामणगाव (देव) येथे मुंगसाजी महाराज संस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली, सर्व सुविधायुक्त भक्तनिवास बांधण्यात आले, वादळी पावसामुळे दोन्ही संस्थानला सुध्दा नुकसान सहन करावे लागले, चिंच देवस्थानच्या भक्तनिवास वरील कवेलू खाली कोसळून फुटले.

अंगावर वीज पडल्याने शेतकरी जखमी

दारव्हा : तालुक्यातील मांगकिन्ही येथे शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला.
शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. शेतकरी देवराव भावराव ठाकरे हे शेतात काम करीत होते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी अचानक त्यांच्या अंगावर वीज पडली.

■ यात त्यांचे पाय व अंग भाजल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना मिथुन गोविंद राठोड या शेतकऱ्याने डोक्यावर उचलून दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.

Web Title: Crop Damage : stormy rains lashed during the season in yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.