पुणे : जुलै आणि ऑगस्ट तसेच सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी कंपन्यांकडे दावे दाखल करावे लागतात.
त्यानुसार आतापर्यंत राज्यात २० लाखांहून दावे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी सुमारे ६ लाख तक्रारींचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. याबाबत विमा कंपन्या लवकरच निर्णय घेणार आहेत.
पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत यंदा १ कोटी ६५ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या योजनेतून नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या पिकांना विमा संरक्षण दिले जाते.
यासंदर्भात कृषी विभाग अधिसूचना जारी करून विमा कंपन्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देते. राज्यात जुलैच्या मध्यापासून सप्टेंबरच्या पहिला आठवड्यापर्यंत अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी दावे दाखल केले आहेत.
त्यानुसार आतापर्यंत २० लाख २७ हजार ५०५ शेतकऱ्यांनी दावे दाखल केले आहेत. कृषी विभाग आणि विमा कंपन्यांमधील झालेल्या करारानुसार या नुकसानीची पाहणी करण्याचे काम सुरु आहे.
पाहणीचे काम सुरू ■ आतापर्यंत ५ लाख ८५ हजार ३०१ तक्रारींची पाहणी पूर्ण झाली असून अजूनही १४ लाख ४२ हजार २०४ तक्रारींची पाहणी करण्याचे काम सुरू आहे.■ सर्वाधिक ५ लाख ३४ हजार १३१ तक्रारी बीड जिल्ह्यातून दाखल झाल्या आहेत. त्या खालोखाल नांदेड जिल्ह्यातून ३ लाख ७१ हजार २९३ तर वाशिम जिल्ह्यातून १ लाख १३ हजार ८४४ तक्रारी विमा कंपन्यांकडे शेतकयांनी दिल्या आहेत.
जिल्हानिहाय तक्रारी■ पुणे - १५५०■ नगर - ३२१७३■ नाशिक - २४१९■ चंद्रपूर - ५७१०४■ सोलापूर - ५८७०■ जळगाव - ६२८०६■ सातारा - ५६०■ परभणी - १६१३१४■ वर्धा - ८४५२८■ नागपूर - २८७९२■ जालना - ५५३१७■ गोंदिया - ३१७■ कोल्हापूर - ४१२२■ ठाणे - ३७■ रत्नागिरी - ४२■ सिंधुदुर्ग - ६१■ नांदेड - ३७१२९३■ संभाजीनगर - ४८०३७■ भंडारा - ११६६■ पालघर - ८०