Lokmat Agro >शेतशिवार > Crop Insurance: कापूस उत्पादकांना मिळणार विम्याचे ६० कोटी

Crop Insurance: कापूस उत्पादकांना मिळणार विम्याचे ६० कोटी

Crop Insurance: Cotton growers will get Rs 60 crore of insurance | Crop Insurance: कापूस उत्पादकांना मिळणार विम्याचे ६० कोटी

Crop Insurance: कापूस उत्पादकांना मिळणार विम्याचे ६० कोटी

Cotton Crop Insurance: कापूस उत्पादकांना विम्याचा लाभ मिळणार आहे. १,८७,७२४ शेतकऱ्यांना विमा कंपनी दोन दिवसांत नुकसान भरपाई देणार आहे.

Cotton Crop Insurance: कापूस उत्पादकांना विम्याचा लाभ मिळणार आहे. १,८७,७२४ शेतकऱ्यांना विमा कंपनी दोन दिवसांत नुकसान भरपाई देणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Cotton Crop Insurance: छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्या अंतिम पीक कापणी अहवालानंतर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ६० (cotton farmers) कोटी रुपये दोन दिवसांत देण्याचा निर्णय पीक विमा (crop Insurance) कंपनीने घेतला आहे.

गेल्या वर्षी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडला होता. सुमारे १६ मंडळांत २० दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाने खंड दिला होता. अशा मंडळातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना शासनाने २५ टक्के अग्रिम रक्कम म्हणून ९५ कोटी रुपये दिले होते. यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. याचाही फटका शेतीमालाला बसला होता. यासंदर्भात शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे दावे केले होते.

  • मध्य हंगाम प्रतिकूलता १,८७,७२४ शेतकऱ्यांना रु. ११४.५१ कोटी वाटप
  • स्थानिक नैसर्गिक आपत्ती (अतिवृष्टी) २,५०,६२३ शेतकऱ्यांना रु. ९५.७३ कोटी वाटप
  • पीक उत्पादनावर आधारित अंतिम नुकसान भरपाई - (कापूस पीक वगळून) १४८९३८ शेतकऱ्यांना रु. ५४.०३ कोटी वाटप

यानंतर विमा कंपनीने १०३ कोटी रुपये दिले होते. अंतिम पीक कापणी अहवालानंतर विमा कंपनीने अंतिम नुकसान भरपाई म्हणून पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत २८९ कोटी रुपये अदा केले होते.

Web Title: Crop Insurance: Cotton growers will get Rs 60 crore of insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.