Lokmat Agro >शेतशिवार > Crop Insurance : फळपिक विमा योजना लागू! कोणत्या फळपिकाला किती मिळणार विम्याची रक्कम?

Crop Insurance : फळपिक विमा योजना लागू! कोणत्या फळपिकाला किती मिळणार विम्याची रक्कम?

Crop Insurance: Crop insurance scheme implemented! Which fruit crop will get how much | Crop Insurance : फळपिक विमा योजना लागू! कोणत्या फळपिकाला किती मिळणार विम्याची रक्कम?

Crop Insurance : फळपिक विमा योजना लागू! कोणत्या फळपिकाला किती मिळणार विम्याची रक्कम?

सरकारने फळपिकांसाठीची विमा योजना लागू केली आहे. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

सरकारने फळपिकांसाठीची विमा योजना लागू केली आहे. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे :  राज्य सरकारने फळपीक विमा योजना चालू वर्ष २०२४-२५ आणि पुढील २०२५-२६ या वर्षासाठी लागू केली आहे. तर राज्यातील ३० जिल्ह्यांतील फळपिक उत्पादकांना विम्याचा लाभ घेता येणार असून त्यासाठी चार विमा कंपन्यांची निवड सरकारने केली आहे. या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

दरम्यान, ही फळपीक योजना मृग बहारातील संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सिताफळ, द्राक्ष (क) या पिकांसाठी तर आंबिया बहारातील संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी व पपई या पिकांसाठी लागू करण्यात आली आहे.

फळपिके - विमा संरक्षित रक्कम (रु. प्रति हेक्टर)

  • संत्रा - एक लाख रूपये प्रति हेक्टर
  • मोसंबी - एक लाख रूपये प्रति हेक्टर
  • डाळिंब - १ लाख ६० हजार
  • काजू - १ लाख २० हजार
  • केळी - १ लाख ७० हजार
  • द्राक्ष - ३ लाख ८० हजार
  • आंबा - १ लाख ७० हजार
  • स्ट्रॉबेरी - २ लाख ४० हजार
  • पपई - ४० हजार
  • चिकू - ७० हजार 
  • पेरू - ७० हजार
  • सीताफळ - ७० हजार


योजनेत भाग घेण्यासाठी  अधिसुचित फळपिकांचे उत्पादनक्षम वय खालील प्रमाणे
अधिसूचित फळ पिक - उत्पादनक्षम वय (वर्ष)

  • आंबा - ५ वर्षे
  • चिकू - ५ वर्षे
  • काजू - ५ वर्षे
  • लिंबू - ४ वर्षे
  • संत्रा - ३ वर्षे
  • मोसंबी - ३ वर्षे
  • सिताफळ - ३ वर्षे
  • पेरू - ३ वर्षे
  • द्राक्ष - २ वर्षे
  • डाळिंब - २ वर्षे


चालू हंगामातील म्हणजेच २०२४ सालातील मृग बहारातील योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत

  • संत्रा, पेरु, लिंबू, द्राक्ष (क)  - २५ जून २०२४ 
  • मोसंबी, चिकू - ३० जून २०२४ 
  • डाळिंब - १४ जुलै २०२४ 
  • सिताफळ - ३१ जुलै २०२४ 

Web Title: Crop Insurance: Crop insurance scheme implemented! Which fruit crop will get how much

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.