Join us

Crop Insurance : जिल्ह्यातील ४ लाख ४० हजार हेक्टरवर क्षेत्र पीक संरक्षित  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 3:06 PM

Crop Insurance : यंदा पीक विमा घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला.

Crop Insurance :  

जयेश निरपळ :

गंगापूर जिल्ह्यातील ४ लाख ४१ हजार ८२२ शेतकऱ्यांनी ११ लाख ३८ हजार ७४४ अर्जाद्वारे एकूण ४ लाख ४० हजार ७४५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा या वर्षी विमा काढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या काही प्रमाणात घट झाली आहे.

बळीराजा आणि नैसर्गिक आपत्ती हे जणू समीकरणच झाले. शेतकऱ्यांना दरवर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असल्याने अनेकदा तोंडाशी आलेला घासही हिरावला जातो.

त्यामुळे जीवापाड जपलेल्या शेतीपिकांना विम्याचे कवच मिळावे, याकरिता शासनाने गेल्या वर्षीपासून १ रुपयात पीकविमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानुसार शासनाने १ ऑगस्टपर्यंत पीकविमा काढण्यास मुदत दिली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ४ लाख ४१ हजार ८२२ शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांना विम्याचे कवच दिले आहे.

गेल्यावर्षी दुष्काळाने मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले होते; मात्र बळीराजाला पाहिजे, त्या प्रमाणात नुकसानभरपाई मिळाली नव्हती. यंदा आतापर्यंत देखील अपेक्षित असा समाधानकारक पाऊस न झाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खबरदारीची उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांनी नाइलाजाने पीकविमाकाढण्याला महत्त्व दिले असले तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत त्यात काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे.

मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांचा कल कमी• गेल्यावर्षी राज्य शासनाच्या वतीने पहिल्यांदाच एक रुपयात पीकविमा योजना राबविण्यात आली होती. त्याला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.• मागील वर्षी ४ लाख ४८ हजार २७३ शेतकऱ्यांचे ११ लाख ५२ हजार ६९४ हजार अर्ज प्राप्त झाले होते. याद्वारे जिल्ह्यातील ४ लाख ४९ हजार ४३३ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होते; मात्र मागील दुष्काळात बळीराजाला पीकविम्याची पाहिजे त्या प्रमाणात नुकसानभरपाई न मिळाल्याने यंदा काही प्रमाणात शेतकऱ्यांनी पीकविमा काढण्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे.

दोन वेळा मुदतवाढ• पिकविमा काढण्यासाठी सुरुवातीला १५ जुलै ही शेवटची तारीख देण्यात आली होती; मात्र 'लाडकी बहीण योजने' मुळे शेतकऱ्यांनी पीकविमा काढण्याकडे दुर्लक्ष केल्याने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.• त्यानंतर शेवटच्या दिवशी पुन्हा एक दिवसाची मुदत वाढून १ ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारले गेले.

पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची तालुकानिहाय आकडेवारी                                                     

तालुकाशेतकरीअर्ज संख्याक्षेत्र (हेक्टर)
छ. संभाजीनगर३३,२२४  ८०,४४०  ३९,४३४.४५
गंगापूर   ५९,६१७    १,३६,७०६  ७९,१९९.९३
कन्नड६७,६०७  १,५५,०५२७५,९५४.८८
खुलताबाद२०,१८०५८,९६४  २६,१५६.५५
पैठण४९,९३८१,२२,५५८६२,८२३.९९
फुलंब्री३४,४१५८९,०००३८,४२८.८५
सिल्लोड६६,४७८  १,८९,६५२८०,८५४.०५
सोयगाव २३,८७६४४,१०९३७,८९२.३५
वैजापूर८६,४८७२,६२,२६३१,१०,६५३.३०
एकूण  ४,४१,८२२११,३८,७४४४,४०,७४५.०५

       

दोन वर्षांची पीकविमा आकडेवारी

वर्ष शेतकरी   अर्जक्षेत्र  (हेक्टर) 
खरीप २०२३४.४८,२७३           ११,५२,६९४४,४९,४३३.४०
खरीप २०२४ ४,४१,८२२११,३८,७४४४,४०,७४५.०५
तफावत (घट)  ६,४५११,३९५०८,६८८.३५
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीक विमापीक