Join us

Crop Insurance : शेतकऱ्यांनो...! आंबिया बहरातील फळपीक विम्यासाठी अर्ज करा; 'ही' आहे अंतिम मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 2:32 PM

Horticulture Crop Insurance Latest Updates : अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांस नोंदणीकृत भाडेकरार अनिवार्य आहे.

Horticulture Crop Insurance : राज्य आणि केंद्र सरकारकडून पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन २०२४-२५ मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्टॉबेरी या ९ फळपिकासाठी ३० जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी लवकरात लवकर शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.

अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांस नोंदणीकृत भाडेकरार अनिवार्य आहे. या योजनेत राज्यात प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागाकरीता एका फळपीकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र १० गुंठे (०.१० है) आणि उर्वरित विभागाकरीता कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र २० गुंठे (०.२० हे.) अशी मर्यादा राहील. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळून जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे.

योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता सर्वसाधारणपणे विमा संरक्षित रकमेच्या ५% असतो. मात्र कमी जिल्ह्यात तो जास्त असू शकतो. आंबिया बहार सन २०२४-२५ या वर्षासाठी अधिसूचित फळ पिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी निश्चित करण्यात आला आहे. अवेळी पाऊस, कमी जास्त तापमान, वेगाचे वारे, गारपीट इत्यादी निर्धारीत केलेले हवामान घोके (Weather Triggers) लागू झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपनी मार्फत देय होणार आहे.

योजनेत सहभाग करीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल (https://pmfby.gov.in) या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच आंबिया बहारात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांसाठी गारपीट (Add on Cover) या हवामान धोक्यासाठी राज्य शासनामार्फत विमा संरक्षण उपलब्ध करुन देण्यात आलेले असून गारपीट या हवामान धोक्यासाठी सहभाग ऐच्छिक राहील व या करीता अतिरिक्त विमा हप्ता देय आहे. ज्या शेतकऱ्यांना गारपीट या हवामान धोक्याकरिता सहभाग नोंदवावयाचा असेल अशा शेतकऱ्यांनी त्यांचा नियमीत व अतिरिक्त विमा हप्ता हा बँकांमार्फतच भरणे आवश्यक आहे.

फळपीक आणि त्यानुसार अर्ज करण्याचा अंतिम दिनांक

टॅग्स :शेती क्षेत्रपीकपीक विमा