Lokmat Agro >शेतशिवार > Crop Insurance : पिकविमा अर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक; १५० रूपयांशिवाय अर्ज भरण्यास नकार

Crop Insurance : पिकविमा अर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक; १५० रूपयांशिवाय अर्ज भरण्यास नकार

Crop Insurance farmers csc centers 150 rs application form agriculture department | Crop Insurance : पिकविमा अर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक; १५० रूपयांशिवाय अर्ज भरण्यास नकार

Crop Insurance : पिकविमा अर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक; १५० रूपयांशिवाय अर्ज भरण्यास नकार

Crop Insurance Latest Updates : शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर वसुलू करण्यात येत आहे.

Crop Insurance Latest Updates : शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर वसुलू करण्यात येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Crop Insurance CSC Center : छत्रपती संभाजीनगर : पीक विमा अर्ज भरण्यासाठी १४ जुलै ही अंतिम तारीख असून राज्यभरातील बहुतांश सीएससी केंद्राकडून पैसे उकळण्यात येत असून शेतकऱ्यांनी पैशांसंदर्भात विचारणा केली असता विमा अर्ज भरण्यास नकार देण्यात येत आहे. तर कृषी विभागाकडूनही अशा केंद्रावर कारवाई केली जात नसल्याची माहिती समोर आली आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील विहामांडवा गावात कॉमन सर्विस सेंटर चालक शेतकऱ्यांकडून एक अर्ज भरण्यासाठी १५० रूपये घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तर यासंदर्भात सदर कॉमन सर्विस सेंटरचालकांशी बोलले असता 'आम्ही विमा फॉर्म भरत नाही' असं सांगण्यात येतंय. यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ होत असून १ रूपयांत पीक विमा योजनेसाठी १५० रूपये दिल्याशिवाय पर्याय नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

 दरम्यान, १५० रूपये दिले नाही तर विमा फॉर्म भरला जात नाही असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात असताना कृषी विभागाकडून ठोस कारवाई केली जात नसल्याचं निदर्शनास येत आहे. पण कृषी विभागाकडून तक्रारीसाठी फोन नंबर आणि व्हाट्सअप नंबर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

जास्त पैसे मागणाऱ्या सीएससी चालकांची इथे करा तक्रार

  • टोल फ्री क्रमांक - १४४११/ १८००१८००४१७
  • तक्रार नोंद - ०२२-४१४५८१९३३/ ०२२-४१४५८१९३४
  • व्हाट्सअप - ९०८२९२१९४८
  • इमेल - support@csc.gov.in

सरकारमान्य सीएससी केंद्रचालकाला सरकारने १ रूपयांपेक्षा अधिक पैसे न घेण्यासंदर्भात तंबी दिलेली आहे. परंतु, महसूल विभाग फक्त सरकारमान्य असलेल्या सीएससी केंद्रालाच अर्जासाठी प्रत्येकी ४० रूपयांचा निधी देते. खासगी ऑनलाईन सेंटर्सना पैसे मिळत नाहीत. म्हणून पीक विमा अर्ज भरून देणाऱ्या खासगी दुकानदारांना आपण निर्बंध लावू शकत नाही.
- वाघचौरे (कृषी सहाय्यक, विहामांडवा, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर)

Web Title: Crop Insurance farmers csc centers 150 rs application form agriculture department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.