Lokmat Agro >शेतशिवार > Crop Insurance : मागच्या खरिपातील पीकविम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळेना! ३ हजार कोटी प्रलंबित

Crop Insurance : मागच्या खरिपातील पीकविम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळेना! ३ हजार कोटी प्रलंबित

Crop Insurance Farmers still don't get the amount of crop insurance from the previous harvest! 3 thousand crore pending | Crop Insurance : मागच्या खरिपातील पीकविम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळेना! ३ हजार कोटी प्रलंबित

Crop Insurance : मागच्या खरिपातील पीकविम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळेना! ३ हजार कोटी प्रलंबित

Crop Insurance : २०२३ साली लागवड केलेल्या खरिपातील पिकांच्या विम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. संबंधित विमा कंपन्यांकडे अजूनही २ हजार ८०० कोटी रूपयांची रक्कम प्रलंबित आहे.

Crop Insurance : २०२३ साली लागवड केलेल्या खरिपातील पिकांच्या विम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. संबंधित विमा कंपन्यांकडे अजूनही २ हजार ८०० कोटी रूपयांची रक्कम प्रलंबित आहे.

शेअर :

Join us
Join usNext

- दत्ता लवांडे
Crop Insurance : मागच्या खरिपातील म्हणजे २०२३ च्या खरिपात लागवड केलेल्या पिकांचा विमा अजूनही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध विभागासाठी लागू केलेल्या विमा कंपन्यांकडे अजून २ हजार ८०० कोटी रूपये प्रलंबित आहेत.

दरम्यान, एक रूपयांत पीक विमा योजना सरकारने लागू केल्यानंतर राज्यातील १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांना विम्यासाठी अर्ज केला होता. पण या हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांचे पावसाच्या अनियमिततेमुळे, पावसातील २१ दिवसांपेक्षा जास्त पडलेल्या खंडामुळे, मातीतील कमी ओलाव्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. विविध ट्रीगर लागू होऊनही आणि पिकांचे पंचनामे होऊनही विमा कंपन्यांकडून अद्यापही शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिलेली नाही.
(Crop Insurance Latest Updates)

कृषी विभागाकडून मिळालेल्या अद्ययावत माहितीनुसार राज्यातील ७ हजार ३२२ कोटी एवढी रक्कम नुकसान भरपाईसाठी निश्चित केलेली होती. त्यातील ४ हजार ५२४ कोटी रूपयांची रक्कम वितरीत करण्यात आलेली असून २ हजार ७९८ कोटी ४३ लाख रूपयांची रक्कम प्रलंबित आहे. त्यातील सर्वांत जास्त रक्कम ही ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीकडे प्रलंबित आहे. निश्चित नुकसान भरपाई असलेल्या ३ हजार ३०९ कोटी रूपयांपैकी या कंपनीने केवळ ८०२ कोटी रूपये वितरित केले आहेत. तर २ हजार ५०७ कोटी रूपये या कंपनीकडे प्रलंबित आहेत. 

त्यापाठोपाठ भारतीय कृषी विमा कंपनीने निश्चित नुकसान भरपाईच्या ९२४ कोटी रूपयांपैकी केवळ ७०४ कोटी रूपये वितरीत केले असून २१९ कोटी रूपये या कंपनीकडे प्रलंबित आहेत. एक वर्ष उलटून गेले तरीही अद्याप मागच्या हंगामातील विमा रक्कम मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. तर विमा कंपन्या एवढ्या नफ्यात असतील तर सरकारची एक रूपयांत पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहे की विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे असा प्रश्न निर्माण होतोय. 

Web Title: Crop Insurance Farmers still don't get the amount of crop insurance from the previous harvest! 3 thousand crore pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.