Crop Insurance Application Date Extended : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पिक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पिक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्याकडून केंद्र सरकारकला करण्यात आली होती. त्यामुळे विमा अर्जासाठी सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.
सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थीची कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या केंद्रांवर गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. अद्याप ही अनेक शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित आहे त्यामुळे पिक विम्याचा अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्र व्यवहार करण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना ३१ जुलै पर्यंत पीक विम्यासाठी अर्ज करता येणार आहेत.
(Crop Insurance Apllication Latest Updates)
दरम्यान, कृषी विभागाच्या अद्ययावत माहितीनुसार, राज्यात यंदाच्या खरीप हंगामात आत्तापर्यंत म्हणजे १५ जुलै सकाळीपर्यंत १ कोटी ३६ लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला होता. राज्यात अनेक भागांत मान्सूनचा पाऊस उशिराने पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या राहिल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा भरता आला नाही. मुदतवाढ दिल्यामुळे या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे.
मागच्या वर्षीच्या हंगामात राज्यातील जवळपास १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी एक रूपयांत पीक विमा योजनेचा लाभ घेतला होता. तर मागच्या हंगामात १ कोटी १३ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित होते. यंदाही जास्तीत जास्त क्षेत्र विमा संरक्षित करण्याचे ध्येय कृषी विभागाने ठेवले आहे.