Kharip Crop Insurance : यंदाच्या खरीप हंगामातही सरकारने १ रूपयांत पीकविमा योजना लागू केली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. मागच्या खरीप हंगामात १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी १ रूपयांत पीक विमा या योजनेचा लाभ घेतला होता. पण यावर्षी खरिपातील कोणत्या पिकासाठी किती विमा संरक्षित रक्कम मिळणार ही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, यंदा सरकारकडून खरिपातील १४ पिकांसाठी विमा योजना लागू केली आहे. यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ, कारळे, कापूस आणि कांद्याचा सामावेश आहे.
पिक - विमा संरक्षित रक्कम रु./हे
- भात - ४०,००० ते ५१,७६०
- ज्वारी - २०,००० ते ३२,५००
- बाजरी - १८,००० ते ३३,९१३
- नाचणी - १३,७५० ते २०,०००
- मका - ६,००० ते ३५,५९८
- तूर - २५,००० ते ३६,८०२
- मुग - २०,००० ते २५,८१७
- उडीद - २०,००० ते २६,०२५
- भुईमुग - २९,००० ते ४२,९७१
- सोयाबीन - ३१,२५० ते ५७,२६७
- तीळ - २२,००० ते २५,०००
- कारळे - १३,७५०
- कापूस - २३,००० ते ५९,९८३
- कांदा - ४६,००० ते ८१,४२२
पिकविमा भरण्यासाठी pmfby.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा सीएससी केंद्रावर विम्यासाठी अर्ज करता येणार आहे. पिकविम्यासाठी अर्जाची अंतिम मुदत ही १५ जुलै असून आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा, आठ अ, पीकपेरा स्वयंघोषणापत्र या कागदपत्रांची आवश्यकता आहे.