Join us

Crop Insurance : शेतकऱ्यांनो त्वरा करा! पीक विमा भरण्याची आजची शेवटची तारीख

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 9:01 AM

Crop Insurance : राहिलेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर यंदाही सरकारने १ रूपयांत पीक विमा योजना लागू केल्यामुळे शेतकऱ्यांना केवळ १ रूपयांत पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. 

Crop Insurance : राज्यातील पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या असून भात उत्पादक शेतकऱ्यांच्या भातलागवडी काही प्रमाणात राहिल्या आहेत. तर आज (३१ जुलै) पीक विमा भरण्याची शेवटची तारीख असल्यामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर यंदाही सरकारने १ रूपयांत पीक विमा योजना लागू केल्यामुळे शेतकऱ्यांना केवळ १ रूपयांत पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. 

दरम्यान, मागच्या वर्षी राज्यातील १ कोटी ७० लाख शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले होते. तर यंदा आत्तापर्यंत १ कोटी ५७ लाख ८६ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. सुरूवातील १५ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती पण केंद्र सरकारने या योजनेसाठी वाढीव मुदत दिल्याने शेतकऱ्यांना ३१ जुलै पर्यंत अर्ज करता येत आहेत. तर आज या योजनेत सहभाग घेण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे. 

आत्तापर्यंत विमा अर्ज केलेल्या शेतकऱ्यांचे १ कोटी ४ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्राला विमा संरक्षण मिळाले असून यासाठी ५१ हजार १८३ कोटी रूपयांची संरक्षित रक्कम आहे. तर आलेल्या एकूण अर्जांतून एक रूपया प्रतिअर्ज याप्रमाणे १ कोटी ५८ लाख ४० हजार रूपये जमा झाले असून सीएससी केंद्रचालकांना विम्याच्या हप्त्यापोटी ७ हजार ६०३ रूपये देणे भाग आहे. तर यातील ४५० कोटी राज्य सरकार तर ३ हजार ९३ कोटी रूपये विमा हप्ता केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे. 

विमा अर्जाची संख्या कमीमागच्या वर्षी १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी एक रूपयांत पीक विमा योजनेचा लाभ घेतला होता पण यंदा मात्र आत्तापर्यंत १ कोटी ५७ लाख शेतकरी या योजनेत सहभागी झाले असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येतंय. तर मुदत वाढीनंतरही आज पीक विम्यासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपीक विमापीक