Crop Insurance Latest Updates : राज्यात पावसाने दमदारपणे हजेरी लावली असून राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या आवरल्या आहेत. १० जुलै अखेरपर्यंत राज्यातील ८२ टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या असून अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला आहे. सरकारने एक रूपयांत पीक विमा योजना लागू केली असून १५ जुलै ही विमा भरण्याची अंतिम तारीख असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, मागच्या खरिपात राज्यातील १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी पिकविम्याचा लाभ घेतला होता. पण यंदा पेरण्या काहीशा लांबल्या असून आत्तापर्यंत म्हणजे १० जुलै अखेरपर्यंत राज्यातील ९७ लाख २९ हजार शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज भरला आहे. तर मागील २४ तासांत ६ लाख ४३ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे.
सीएससी केंद्रचालकांकडून वसुलीसरकारने एक रूपयांत पीक विमा योजना लागू केली असून विम्याचा हफ्ता सरकार भरणार आहे. त्याचबरोबर एक फॉर्म भरण्यासाठी सीएससी केंद्राला ४० रूपये देण्यात येत आहेत. तरीही सीएससी केंद्रचालक शेतकऱ्यांकडून फॉर्म भरण्यासाठी पैसे घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. एका फॉर्मसाठी १०० ते १५० रूपयांची मागणी केली जात आहे. पैसे मागणाऱ्या सीएससी केंद्रचालकांची तक्रार कृषी विभागाकडे करता येणार आहे. (Crop Insurance Latest Updates)
१५ जुलै अंतिम तारीखपीक विमा भरण्यासाठी १५ जुलै ही अंतिम तारीख असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. तर पेरण्यांना उशीर झाल्यामुळे विमा भरण्यासाठीची मुदत वाढू शकते अशीही शक्यता आहे.
कोणत्या विभागात किती शेतकऱ्यांनी केला अर्ज
- कोकण विभाग - ६२ हजार ९२१
- नाशिक विभाग - ६ लाख २३ हजार ८९२
- पुणे विभाग - १२ लाख ३ हजार ३२३
- कोल्हापूर विभाग - २ लाख ६५ हजार ९७९
- छत्रपती संभाजीनगर विभाग - २६ लाख ६० हजार ७४९
- लातूर विभाग - २६ लाख ६१ हजार ७९१
- अमरावती विभाग - १६ लाख ५७ हजार ५२४
- नागपूर विभाग - ५ लाख ९३ हजार ४७५
- एकूण अर्ज - ९७ लाख २९ हजार ६५४