Join us

Crop Insurance सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ९० हजार शेतकऱ्यांची ११३ कोटी रुपये विमा रक्कम जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 10:48 AM

प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०२३ मध्ये ६ लाख ७६ हजार ३११ शेतकऱ्यांनी ५ लाख २३ हजार १७७ हेक्टर पीक क्षेत्रासाठी पीकविमा भरला असून यापैकी १ लाख ९० हजार ४५८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी ८२ लाख रुपयांचा विमा निधी जमा झाला आहे.

सोलापूर : प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०२३ मध्ये ६ लाख ७६ हजार ३११ शेतकऱ्यांनी ५ लाख २३ हजार १७७ हेक्टर पीक क्षेत्रासाठी पीकविमा भरला असून यापैकी १ लाख ९० हजार ४५८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी ८२ लाख रुपयांचा विमा निधी जमा झाला आहे.

विमा कंपनीने बाजारी, मका तसेच सोयाबीन पिकांसाठी ही रक्कम मिळाली आहे, अशी माहिती कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी दिली. खरीप हंगाम २०२३ अंतर्गत प्रतिकूल परिस्थितीच्या अनुषंगाने अधिसूचित सर्व पिकासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अधिसूचना काढून २५ टक्के अग्रीम नुकसानभरपाई देण्याबाबत पीकविमा कंपनीला आदेश दिला होता.

त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीकडे पाठपुरावा देखील केला. ओरिएंटल विमा कंपनीकडून मका, सोयाबीन व बाजरी पिकासाठी २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळाला आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने ६५ हजार ९१८ शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्या होत्या.

त्यापैकी ५९ हजार ११० शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करून त्यापैकी २५ हजार ९५४ पात्र शेतकऱ्यांना रक्कम रुपये २४.९५ कोटी निधी वितरित करण्याची कार्यवाही पीकविमा कंपनीमार्फत सुरू आहे. तसेच काढणीपश्चात नुकसानीअंतर्गत २१ हजार ३८४ पूर्वसूचनांपैकी १४ हजार ४४५ पंचनामे पूर्ण झाले आहेत.

या शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची परिगणना करण्याची कार्यवाही पीकविमा कंपनीस्तरावर सुरू आहे. तसेच पीक कापणी प्रयोगातील उत्पादनाच्या आधारे अंदाजे १ लाख ८० हजार शेतकऱ्यांना रक्कम रुपये ७०.४७ कोटी नुकसानभरपाई देय आहे.

टॅग्स :पीक विमापीकखरीपसोलापूरजिल्हाधिकारीशेतकरीशेती