Lokmat Agro >शेतशिवार > Crop Insurance : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतेय नुकसानीची रक्कम 

Crop Insurance : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतेय नुकसानीची रक्कम 

Crop Insurance: The amount of loss is credited to the farmer's account  | Crop Insurance : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतेय नुकसानीची रक्कम 

Crop Insurance : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतेय नुकसानीची रक्कम 

Crop Insurance : शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीची रक्कम जमा होतेय.

Crop Insurance : शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीची रक्कम जमा होतेय.

शेअर :

Join us
Join usNext

Crop Insurance : चालू वर्षीत फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांमध्ये नैसर्गिक संकट ओढवून झालेल्या पीक नुकसानीपोटी शासनस्तरावरून अमरावती विभागातील २ लाख १३ हजार २६२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'डीबीटी'द्वारे भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी ३८२ कोटी १२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.


यासंदर्भात २ ऑगस्ट रोजी पारित झालेल्या शासन निर्णयात नमूद आहे की, जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये अवेळी झालेल्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले.


फेब्रुवारी महिन्यात अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यात ९ हजार ६४४, अकोला ११ हजार ८०७, यवतमाळ ११ हजार २४३, बुलढाणा ५७ हजार २४० आणि वाशिम जिल्ह्यातील ८ हजार २४१ शेतकरी यामुळे बाधित झाले. भरपाईपोटी १४१ कोटी १२ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले.


तसेच मार्च ते एप्रिल या महिन्यांमध्ये देखील विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये १ लाख १५ हजार ४७ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, त्यांच्यासाठी २४१ कोटींची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. 
५ ऑगस्टपासून प्रत्यक्षात हा निधी 'डीबीटी'द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वळता करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे.

 

Web Title: Crop Insurance: The amount of loss is credited to the farmer's account 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.