Lokmat Agro >शेतशिवार > Crop Loan शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात राष्ट्रीयीकृत बँकांचा हात आखडता

Crop Loan शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात राष्ट्रीयीकृत बँकांचा हात आखडता

Crop Loan Nationalized banks cant help in giving crop loans to farmers | Crop Loan शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात राष्ट्रीयीकृत बँकांचा हात आखडता

Crop Loan शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात राष्ट्रीयीकृत बँकांचा हात आखडता

खरिप हंगामात आजवर ७५ टक्के पेरण्या झाल्या आहेत, पण खासगी बँकांच्या तुलनेत सहकारी बँकांनी आजवर ४६ टक्के कर्ज शेतकऱ्यांना दिले आहे.

खरिप हंगामात आजवर ७५ टक्के पेरण्या झाल्या आहेत, पण खासगी बँकांच्या तुलनेत सहकारी बँकांनी आजवर ४६ टक्के कर्ज शेतकऱ्यांना दिले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

विकास राऊत

खरीप हंगाम २०२४-२५ या वर्षासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासाठी राष्ट्रीयीकृत खासगी व सहकारी बँकांना १५५४ कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे लक्ष्य छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने ठरवून दिले आहे.

खरिप हंगामात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजवर ७५ टक्के पेरण्या झाल्या आहेत, पण खासगी बँकांच्या तुलनेत सहकारी बँकांनी आजवर ४६ टक्के कर्ज शेतकऱ्यांना दिले आहे. राष्ट्रीयीकृत व खाजगी बँकांच्या तुलनेत सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना अर्थसाह्य करण्याचे प्रमाण जास्त आहे.

राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यात टाळाटाळ करीत आहेत. सीबिल तपासत आहेत. शेतकऱ्यांचे सीबिल तपासू नये, असे राज्य सरकारचे आदेश असले तरी त्याकडे बँकांनी स्पेशल दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या २८६ बँकांना १५५४ कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. ९८ हजार ३७९ खातेदारांना ७१० कोटींचे कर्ज या बँकांनी आजवर दिले.

राष्ट्रीयीकृत बँकांनी किती कर्ज दिले?

बँकेचे नावशाखा कर्ज टार्गेट (कोटीत)खातेदारकर्ज वाटप टक्के
बँक ऑफ बडोदा १७७४.६३६२८८.५२ कोटी११
बँक ऑफ इंडिया ४१.३२४०१४.३४ कोटी११
बँक ऑफ महाराष्ट्र २५१६३.१६२३५०३०.२१ कोटी१९
कॅनरा बँक११४.८८४११.४२ कोटी२९
सेंट्रल बँक ऑफ इंडिया१०५६.६४१००११२.६ कोटी२१
इंडियन बँक २१.६७१४७७ लाख ०४
पंजाब नॅशनल बँक १७.३०९५२.९८ कोटी१७
स्टेट बँक ऑफ इंडिया ३५३२०.५३११७००१०९.२५ कोटी३४
युनियन बँक ऑफ इंडिया ३५.६९१४७१.९४ कोटी०५
एकूण ११९७३५.२११७०७७१७१.४९ कोटी २३

खाजगी बँकांनी किती कर्ज दिले?

बँकेचे नाव शाखाकर्ज टार्गेट (कोटीत)खातेदारकर्ज वाटपटक्के
अॅक्सिस बँक १९.५०१६१.६५ कोटी०८
सीएसबी बँक ००००००००००
एचडीएफसी बँक६५.१९१०४६१४.९५ कोटी२३
आयसीआयसीआय बँक २६.३१४५७० लाख ०३
आयडीबीआय बँक ११.६०४२७० लाख ०६
आरबीएल १४.३१०४६६ लाख ०५
एकूण १७१३६.१९११५८१९.२१ कोटी१४

सहकारी बँकांनी किती कर्ज दिले?

बँकेचे नाव शाखा कर्ज टार्गेट (कोटीत)खातेदार कर्ज वाटप टक्के 
महा.ग्रामीण बँक ३१२२७.१८ कोटी १५३९०१६२.२५ कोटी७१
जि.म.स.बँक ११९४५४.९८ कोटी६४७५४ ३५७.९४ कोटी७९

Web Title: Crop Loan Nationalized banks cant help in giving crop loans to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.