Lokmat Agro >शेतशिवार > Kharif Crop Loan खरिपासाठी सर्वाधिक पीककर्ज कोणत्या पिकाला?

Kharif Crop Loan खरिपासाठी सर्वाधिक पीककर्ज कोणत्या पिकाला?

Crop Loan; Which crop has the highest crop loan for Kharif season? | Kharif Crop Loan खरिपासाठी सर्वाधिक पीककर्ज कोणत्या पिकाला?

Kharif Crop Loan खरिपासाठी सर्वाधिक पीककर्ज कोणत्या पिकाला?

खरीप Kharif Crop Loan हंगामासाठी राज्य सरकारने पीककर्जाची रक्कम निश्चित केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात द्राक्षपिकासाठी सर्वाधिक ३ लाख ७० हजारांचे कर्ज देण्यात येणार आहे.

खरीप Kharif Crop Loan हंगामासाठी राज्य सरकारने पीककर्जाची रक्कम निश्चित केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात द्राक्षपिकासाठी सर्वाधिक ३ लाख ७० हजारांचे कर्ज देण्यात येणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

तळेगाव दाभाडे : खरीप हंगामासाठी राज्य सरकारने पीककर्जाची रक्कम निश्चित केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात द्राक्षपिकासाठी सर्वाधिक ३ लाख ७० हजारांचे कर्ज देण्यात येणार असून, जिल्ह्यात खरिपातील प्रमुख पीक असलेल्या बाजरी पिकासाठी प्रति हेक्टर ४३ हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहे.

पीक किमान कर्ज
■ द्राक्ष ३,७०,०००-३,५०,०००
■ ऊस १,६५,०००-१,६०,०००
■ बाजरी ४३,०००-३०,०००
■ ज्वारी ४४,०००-३०,०००
■ कापूस ६५,०००-५२,०००
■ बटाटा १,०५,०००-१,००,०००
■ टोमॅटो १,०५,०००-१,००,०००
■ भात ७५,०००-६५,०००
■ मका ३७,०००-३०,०००
■ सोयाबीन ६०,०००-५५,०००

यावर्षी कर्जात २० हजार वाढ
जिल्ह्यात द्राक्षपिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. या पिकाला हेक्टरी लागणारा खर्च अन्य पिकांच्या तुलनेत जास्त असल्याने द्राक्षासाठी हेक्टरी ३ लाख ७० हजार रुपयांचे कर्ज दिले जाते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा त्यात २० हजारांची वाढ केली आहे.

कर्जमर्यादा वाढवली
दरवर्षी खते, बियाणे तसेच औषधांच्या किमतीमध्ये वाढ होत असल्याने पीककर्ज मर्यादितही वाढ करण्यात आली आहे.

जिल्हास्तरीय तांत्रिक समितीच्या निर्णयानुसार हे पीककर्ज मर्यादा निश्चित करण्यात येते. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून तसेच राष्ट्रीयीकृत बँका व खासगी बँकाही कर्ज देतात. पीककर्ज मर्यादेनुसार शेतकऱ्यांनी मागणी करावी. - अनिरुद्ध देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, पीडीसीसी बँक

 अधिक वाचा: Soybean Sowing सोयाबीन पेरणीचे नियोजन करताय? या महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या

Web Title: Crop Loan; Which crop has the highest crop loan for Kharif season?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.