सांगली जिल्ह्यात सलग तीन दिवस अवकाळी पावसामुळे दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, आंबा, पपई बागांसह ज्वारी, मका पिकाचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आठवडाभरापासून खराब हवामान आणि गेल्या चार दिवसांपासून सातत्याने पडणारा पाऊस, यामुळे जिल्हाभरातील द्राक्ष बागांत घडकुज, मणीगळ आणि मण्यांना तडे गेल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीबद्दल शेतकऱ्यांनी महसूल व कृषी विभागाशी संपर्क करून माहिती देण्याची गरज आहे.
पावसामुळे पिकांचे झालेले नुकसानद्राक्षे : सलग तिसऱ्या वर्षी, ऐन हंगामात अवकाळी पावसाने तडाखा दिल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे. जिल्ह्यातील ५६ हजार एकरावरील द्राक्ष बागांचे क्षेत्र अवकाळीने पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. आठवडाभरापासूनचे खराब हवामान आणि गेल्या चार दिवसांपासून सातत्याने पडणारा पाऊस, यामुळे जिल्हाभरातील द्राक्ष बागांत घडकुज, मणीगळ आणि मण्यांना तडे गेले आहेत. त्यामुळे तब्बल साडेपाच लाख टन दाक्षांची माती झाली असून, दाक्ष पिकविण्यासाठी वर्षभरात केलेला सुमारे दोन हजार २०० कोटी रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.डाळींब : अवकाळी पावसामुळे डाळिंब बागांनाही फटका बसला आहे. तेल्या रोगासह फळकुज रोगाचा फैलाव वाढला आहे.ज्वारी : जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये सर्वाधिक क्षेत्र हे ज्वारीचे आहे. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ज्वारीचे पीक आडवे झाल्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.झेंडू : सलग तीन दिवसांच्या पावसामुळे झेंडू खराब झाला आहे.
सर्वाधिक नुकसान तासगाव तालुक्यातअवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष पिकाला बसला आहे. तासगाव तालुक्यात द्राक्षाचे सर्वाधिक क्षेत्र असल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे कृषी विभागाचा अंदाज आहे.
कुठे कराल तक्रार?अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पिक विमा काढला असेल तर नुकसानीची माहिती पिक विमा कंपनी प्रतिनिधी, पिक विमा अॅप किंवा कृषी विभागाला कळवावे.
प्रशासनाकडून पंचनामेसलग तीन दिवसांच्या अवकाळी पावसामुळे दाक्ष, डाळिंब बागांसह ज्वारी, पपई, मका पिकाचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार चार हजार २३९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.