Lokmat Agro >शेतशिवार > बँकांमधील गर्दी होणार कमी; आता रेशन दुकानांवर मिळणार मिनी बँकेची सुविधा

बँकांमधील गर्दी होणार कमी; आता रेशन दुकानांवर मिळणार मिनी बँकेची सुविधा

Crowds in banks will be reduced; now mini bank facilities will be available at ration shops | बँकांमधील गर्दी होणार कमी; आता रेशन दुकानांवर मिळणार मिनी बँकेची सुविधा

बँकांमधील गर्दी होणार कमी; आता रेशन दुकानांवर मिळणार मिनी बँकेची सुविधा

बँकांची कमतरता आणि बँकांबाहेर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सर्व रेशन दुकानांवर मिनी बैंक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे.

बँकांची कमतरता आणि बँकांबाहेर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सर्व रेशन दुकानांवर मिनी बैंक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यातील बँकांची कमतरता आणि बँकांबाहेर होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांवर मिनी बैंक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे.

याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात मिनी बँक जागरूकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत मिनी बँकेच्या माध्यमातून तळागाळातील आदिवासी नागरिकांना बैंकिंग सुविधा कशा सहज उपलब्ध होतील यावर मंथन करण्यात आले.

रेशन दुकानांद्वारे मिनी बँक आर्थिक व्यवहार सुलभ करण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील ९०० पैकी ८३० गावांमध्ये ऑनलाइन पॉस मशीनच्या माध्यमातून धान्य वितरण सुरू आहे.

याच गावांतील रेशन दुकानदारांनी मिनी बँकच्या माध्यमातून बँकिंग सुविधा पुरवण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले. मिनी बैंक हा व्यवसाय नसून सामाजिक जाणिवेतून नागरिकांना ऑनलाइन व्यवहारांची सवय लावण्यासाठी रेशन दुकानदारांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

चांगले काम करणाऱ्या रेशन दुकानदारांचा सन्मान

• कार्यशाळेत शंभर टक्के धान्य वितरण करणाऱ्या उत्कृष्ट स्वस्त धान्य दुकान चालकांचा सत्कार करण्यात आला.

• या वेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अॅड. डी. एम. प्रसन्न, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, लीड बैंक मॅनेजर सचिन गांगुर्डे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या अध्यक्षा वंदना तोरवणे, मिनी बँक अधिकारी किरण पाटील, तहसीलदार मिलिंद कुलथे यांसह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

• यावेळी सन्मानीत करण्यात आलेल्या रेशन दुकानदारांमध्ये सरस्वती महिला बचत गट, पालीपाडा (नवापूर). याहा पांढरमाता महिला बचत गट, दहेल (अक्कलकुवा). छत्रपती शेतकरी कृषी, खोंडामळी (नंदुरबार), विठ्ठल नथ्थू पाटील, प्रकाशा (शहादा). शमिलाबाई छगन नाईक, रामपूर (तळोदा) या दुकानदारांचा समावेश आहे.

१३ बँक शाखा मंजूर...

नंदुरबार जिल्ह्यात नव्याने बँकेच्या १३ शाखा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन पाठपुरावा करीत आहे. त्यापैकी दोन बँकेच्या शाखा सुरू झाल्या आहेत. उर्वरित ठिकाणी लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. चार महिन्यात नऊ बैंक शाखा सुरू करण्याची परवानगी घेतली गेली आहे.

मैलोन मैल प्रवास करणाऱ्या दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा...

• ही योजना राबविल्यास बँकेसाठी मैलोन् मैल प्रवास करावा लागणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. बँकेत जाण्यासाठी फिरफिर टळणार आहे.

• गावातीलच रेशन दुकानांवर रोख रक्कम जमा महत्त्वाचे बँकिंग व्यवहार करता येणार आहेत. यामुळे डिजिटल व्यवहारांना गती मिळेल आणि आर्थिक समावेशनाला बळकटी मिळेल.

• जिल्हा प्रशासनाच्या या पुढाकारामुळे आदिवासी भागातील नागरिकांच्या आर्थिक सशक्तीकरणाला नवा मार्ग मिळणार आहे. आगामी काळात रेशन दुकानांमार्फत मिनी बँक सुविधेचा प्रभाव अधिक विस्तारण्याची अपेक्षा आहे.

• ही योजना व उपक्रम यशस्वी झाल्यास ग्रामिण भागातील नागरिकांना सोयीचे होणार आहे. त्यासाठी सहा महिने याकरीता अभ्यास केला जाणार असून नंतर अधिक प्रभावी राबविली जाणार आहे. 

हेही वाचा : बांधावर झाड लावायला विसरू नका; खत फवारणीचा ताण नाही सोबत कमी खर्चातही जास्त उत्पन्न देणारी चिंच

Web Title: Crowds in banks will be reduced; now mini bank facilities will be available at ration shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.