छत्रपती संभाजीनगर : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ मुलांच्या आंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धा आदित्य कृषि महाविद्यालय बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या. दिनांक ०९ नोहेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या या स्पर्ध्येमध्ये छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित कृषि महाविद्यालय कांचनवाडी छत्रपती संभाजीनगरच्या व्हॉलीबॉल संघाने रौप्य पदक मिळविले.
आंतर महाविद्यालयीन व्होलीबॉल स्पर्ध्येमध्ये २२ कृषि महाविद्यालयांचे संघ सहभागी झालेले होते. अंतिम सामना हा कृषि महाविद्यालय, कांचनवाडी विरुद्ध आदित्य कृषि महाविद्यालय, बीड या संघादरम्यान पार पडला. या सामन्यामध्ये सीएसएमएसएस कृषि महाविद्यालयाच्या संघाने आदित्य कृषि महाविद्यालयाच्या संघावर १ पॉइंट ने विजय मिळवत रौप्य पदक मिळविले. उल्लेखनीय बाब म्हणजे कृषि महाविद्यालय कांचनवाडी या संघातील तीन विद्यार्थ्यांची निवड विद्यापीठाच्या संघामध्ये करण्यात आलेली असून अश्वमेध क्रीडा स्पर्धेसाठी हे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशा मागे प्रशिक्षक तथा मार्गदर्शक प्रा. राजाराम राठोड, डॉ. सचिन गायकवाड, डॉ. नंदू भगस यांचे मोलाचे मार्गदर्शन राहिले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या कौतुकास्पद विजयाबद्दल संस्थेचे सचिव मा. पद्माकर मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, कृषि महाविद्यालयाचे संचालक डॉ. दत्तात्रय शेळके, प्राचार्य डॉ. प्रवीण बैनाडे तथा उप-प्राचार्य प्रा. अतुल भोंडवे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.